शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक वसाहतीतील हवाला प्रकरणाची होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 01:08 IST

स्टील उद्योजक आणि स्टील ब्रोकरमध्ये हवाला प्रकरणातील पैशावरून जो वाद होऊन सतीश राठी यांना जी मारहाण झाली, त्या प्रकरणात आता पोलीस निरीक्षकांसह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या आठवड्यात स्टील उद्योजक आणि स्टील ब्रोकरमध्ये हवाला प्रकरणातील पैशावरून जो वाद होऊन सतीश राठी यांना जी मारहाण झाली, त्या प्रकरणात आता पोलीस निरीक्षकांसह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.येथील गजकेसरी स्टीलमध्ये सतीश राठी यांना जबर मारहाण करण्यात आली. यावेळी चंदनझिरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या समक्ष ही घटना घडल्याने त्याला वेगळे वळण मिळाले आहे. एकूणच या प्रकरणात माहेश्वरी समाजाने संतप्त भूमिका घेऊन पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. यावेळी या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याचे निर्देश दिल्याचे सूत्रांनी सांगितले.जालन्यातील स्टील उद्योजकाचे राठी यांना जवळपास ७० लाख रूपयांपेक्षा जास्तीचे पैसे देणे बाकी होते असे समजते. परंतु यात तथ्य नसल्याचे राठी यांचे म्हणणे आहे. एकूणच हा सर्व व्यवहार हवालाचा असल्याने हे पैसे कोणाकडून आणि कोणत्या व्यवहाराचे होते, तसेच त्या व्यवहाराचे पक्के बिल होते काय, याचीही चौकशी पोलीस करणार आहेत. दरम्यान यापूर्वीही जालना रेल्वे स्थानकावर जी २७ लाख रूपयांची बॅग चोरीला गेली होती. त्या प्रकरणातही अद्यापही मूळ मालक ना रेल्वे पोलीस ना जालना पोलीसांकडे हजर झाला नाही. त्यामुळे ते २७ लाख रूपये देखील हवालातील आहेत की, काय अशी श्ंका उपस्थित केली जात आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसीCrime Newsगुन्हेगारी