शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

सशस्त्र तिघांकडून चंदनझिरा भागात लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 00:59 IST

चोरट्यांनी एकाला चाकूचा धाक दाखवून दहा मोबाईल, गळ्यातील सोन्याचा शिक्का व पंधरा हजार रुपये असा एकूण सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला

लोकमत न्यूज नेटवर्कचंदनझिरा : चोरट्यांनी एकाला चाकूचा धाक दाखवून दहा मोबाईल, गळ्यातील सोन्याचा शिक्का व पंधरा हजार रुपये असा एकूण सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शहरातील चंदनझिरा भागातील सत्यमनगर येथील सिराज पटेल यांच्या घरी बुधवारी मध्यरात्री घडली.चंदनझिरा या भागात मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग वास्तव्यास आहे. बाहेरील राज्यातील कामगार या भागात राहतात. सिराज पटेल यांच्या मालकीच्या पाच रूममध्ये रात्री अडीच वाजता चोरी झाली. यामध्ये गगणदेव शहा एका रूममध्ये झोपलेला होता. एक चोरटा खिडकीमधून आतमध्ये आला. त्यानंतर त्याच्या दोन साथीदारांनी आत प्रवेश करून गगनदेव शहा याच्या मानेवर चाकू धरला. तसेच त्याला मारहाण करून बॅगमधील तीन हजार, मोबाईल हिसकावून घेतले. त्यानंतर चोरट्यांनी बाजूच्या रूममध्ये जाऊन बॅग, कपडे, कॅश पैसे, एटीएम कार्ड व मोबाईल असा माल लंपास केला. यामध्ये राजेश शहा, प्रदीप कुमार राम, अनिल पासवान, रवी कुमार, शिवप्रसाद केवट, त्रिभुवन राम, महेश पासवान यांच्या वस्तू गेल्या आहेत. चोरटे फरार झाल्यानंतर शहा यांनी घर मालकाला हकीत सांगितली. त्यानंतर लगेच त्यांनी चंदनझिरा पोलीस ठाण्यात ही माहिती दिली.चंदनझिरा ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.गुरुवारीही पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहणी केली. त्यात तीन चोरटे तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवर आल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पो.नि. शामसुंदर कौठाळे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

टॅग्स :DacoityदरोडाRobberyचोरीCrime Newsगुन्हेगारी