शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

दरोडा, अपघाताच्या तक्रारींमुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांची धांदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 00:02 IST

घर, दुकानावर दरोडा पडला, दुचाकीस्वारांनी लुटले, महामार्गावर अपघात झाला अशा एक ना अनेक प्रकारच्या तक्रारी अचानक दाखल झाल्याने शनिवारी सायंकाळी जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठी धांदल उडाली.

विजय मुंडे।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : घर, दुकानावर दरोडा पडला, दुचाकीस्वारांनी लुटले, महामार्गावर अपघात झाला अशा एक ना अनेक प्रकारच्या तक्रारी अचानक दाखल झाल्याने शनिवारी सायंकाळी जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठी धांदल उडाली. माहिती मिळताच काही ठिकाणच्या अधिकारी, कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असतानाच या तक्रारी वरिष्ठांच्या सूचनेनुसार अधिकारी, कर्मचा-यांची तत्परता तपासण्यासाठी दिल्याचे समजताच अनेकांनी सुटकेचा नि:श्वास घेतला.पोलीस ठाण्यांमधील कामकाजात सुसूत्रता यावी, सर्व कामे वेळेत व्हावीत, तक्रारदारांच्या तक्रारी घेण्यासह त्यांना चांगली वागणूक मिळावी, यासाठी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार हे वेळोवेळी अधिकारी, कर्मचा-यांना सूचना देत आहेत. शिवाय ठाणेस्तरावरील गुन्ह्यांचे प्रमाण, तपास यासह इतर बाबींवरही बैठकांमध्ये मार्गदर्शन केले जाते.ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी सतर्क राहतात का? ठाण्यात येणाºया तक्रारींची तातडीने दखल घेतली जाते का ? तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिकारी, कर्मचारी तातडीने हालचाली करतात का ? यासह इतर बाबींची तपासणी करण्यासाठी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांनी जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये शनिवारी सायंकाळी तक्रारी घेऊन काही नागरिकांना पाठविले होते. हे तक्रारदार पाठविताना कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. अचानक दरोडा, लूटमार, अपघातासह इतर तक्रारी दाखल झाल्याने कर्मचा-यांसह अधिका-यांची धांदल उडाली. तक्रारदाराकडून माहिती घेऊन घटनास्थळी जाणे, सीसीटीव्ही फुटेज तपासणे, पथकांना पाचरण करणे इ. प्रक्रिया काही ठाणेस्तरावरून राबविण्यात आली. गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असताना या तक्रारी वरिष्ठांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचे समजताच अधिकारी, कर्मचा-यांना हायसे वाटले. या तक्रारीच्या परीक्षेत काही ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी पास झाले होते. तर इतर काही ठिकाणावरील अहवाल रात्री उशिरापर्यंत वरिष्ठांकडे आला नव्हता.तत्परता पाहण्यासाठी राबविला उपक्रमपोलीस अधिकारी, कर्मचा-यांनी सतर्क राहावे, ठाण्यात येणारी प्रत्येक तक्रार नोंदवून घ्यावी, तक्रारीनुसार तातडीने कार्यवाही करावी, याबाबत वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार ठाणेस्तरावरील अधिकारी, कर्मचारी किती सतर्क आहेत? तक्रारदाराला वागणूक कशी मिळते? तक्रारीनुसार कार्यवाही होते का याची पाहणी करण्यासाठी शनिवारी हा उपक्रम राबविण्यात आला. सर्व ठाणेस्तरावरील उपक्रमांचा अहवाल मागिवला असून, तक्रारींकडे दुर्लक्ष करणाºयांवर कारवाई होईल. -समाधान पवार, अपर पोलीस अधीक्षक

टॅग्स :Jalna Policeजालना पोलीसJalna S Pपोलीस अधीक्षक, जालनाDacoityदरोडाCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरी