शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दरोडेखोरांची किरायदार महिलेस मारहाण, धमकावून घरमालकिणीस आवाज देण्यास लावत लुटले

By दिपक ढोले  | Updated: June 16, 2023 19:54 IST

शहरातील टीव्ही सेंटर भागातील म्हाडा कॉलनी भागातील घटना

जालना : किरायादार महिलेला घरमालकिणीला आवाज द्यायचे सांगून चोरट्यांनी घरमालकिणीला मारहाण करत घरातील रोख रक्कम व दागिने असा एक लाख ३० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना शहरातील टीव्ही सेंटर भागातील म्हाडा कॉलनी भागात शुक्रवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली. 

शहरातील दूरदर्शन केंद्रासमोर म्हाडा कॉलनी आहे. या कॉलनीत प्रकाश सुपारकर यांचे घर आहे. प्रकाश सुपारकर यांची पत्नी सावित्री सुपारकर व त्यांची मुलगी रात्री नेहमीप्रमाणे घरामध्ये झोपलेले होते, तर उकाडा असल्याने त्यांचे किरायदार आणि इतर सदस्य घरांच्या गच्चीवर झोपले होते. मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी सुपाकर यांच्या किरायदाराच्या घराचा दरवाजा उघडला. घरातील साहित्य अस्ताव्यस्त केले. प्रकाश सुपाकर यांचे आईवडील राहत असलेली खोली उघडून त्यांनाही मारहाण केली. नंतर गच्चीवर झोपलेल्या किरायदार महिलेस धमकावून सुपारकर यांच्या पत्नी सावित्री सुपारकर यांना बाहेरून आवाज देण्यास सांगितले. 

किरायादार महिलेने आवाज दिल्याने सावित्रीबाई सुपारकर यांनी दार उघडले. दार उघडताच सावित्रीबाई यांना समोर चार-पाच चोरटे दिसले. त्यामुळे सावित्रीबाई यांनी पुन्हा दार लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरोडेखोरांनी त्यांना काठीने डोक्यात मारहाण करून जखमी केले. घरात प्रवेश करून घरातील साहित्य, लोखंडी कपाट, लोखंडी पेटी, महालक्ष्मीचे साहित्य अस्ताव्यस्त केले. हाती लागलेले ७३ हजार रुपये रोख व दागिने असा एकूण एक लाख ३० हजारांचा ऐवज लंपास केला. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका ठाण्याचे सहायक निरीक्षक रवी अंभुरे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून तपासाला सुरुवात केली.दरम्यान, या प्रकरणी सावित्रीबाई सुपारकर यांच्या फिर्यादीवरून चार संशयित दरोडेखोरांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक अंभोरे करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना