शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

लग्नघरांना लक्ष्य करणारी टोळी सक्रिय; नांदेड जिल्हा कारागृह अधीक्षकांच्या घरावर दरोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 16:25 IST

वाटूर फाट्यावर पुन्हा एकदा दरोडा; मुलाच्या लग्नाच्या दोन दिवसांतच नांदेड जिल्हा कारागृह अधीक्षकाच्या घरी सशस्त्र दरोडा, परिसरात भीतीचे वातावरण

- अझहर शेख वाटूर (ता. परतूर, जि. जालना): नांदेड येथील जिल्हा कारागृह अधीक्षक संपत हामु आढे यांच्या वाटूर फाटा येथील घरी २५ मे रोजी पहाटे सशस्त्र दरोड्याची धक्कादायक घटना घडली. पहाटे २. ३० वाजता काही अज्ञात दरोडेखोरांनी आढे यांच्या घरावर हल्ला चढवत नववधूचे दागिने आणि रोकड लंपास केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे, याच परिसरात आठ ते नऊ महिन्यांपूर्वी लग्न समारंभ झाल्यानंतर अशीच एक दरोड्याची घटना घडली होती. यावेळीही, आढे यांच्या मुलाच्या लग्नानंतर दोनच दिवसांत पुन्हा दरोडा पडल्याने या परिसरात लग्नघरांना लक्ष्य करणारी टोळी सक्रिय असल्याची चर्चा सुरू आहे.

संपत आढे हे सध्या नांदेड येथे वास्तव्यास असून, त्यांचा मुलगा सचिन, सून काजल आणि तीन वर्षांचा नातू वेदांत हे वाटूर येथे राहतात. आढे यांच्या धाकट्या मुलाचे दोन दिवसांपूर्वी लग्न झाले आहे. त्यानंतर काही नातेवाईक वाटूर येथे थांबले तर इतर नांदेड येथे गेले. दरम्यान, २५ मे रोजी पहाटे काही दरोडेखोरांनी खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला. घरात इतरत्र लूट केल्यानंतर सचिन यांच्या या बेडरूमचा दरवाजा जोरजोरात ठोठावत "बेटा, दार उघड, अन्यथा.." अशी धमकी दिली. दरोडेखोरांच्या धुमाकूळाने सचिन यांना जाग आली. त्यांनी तत्काळ ११२ वर कॉल करून पोलिसांना संपर्क केला, तसेच नातेवाईकांनाही माहिती दिली. काही वेळाने दरोडेखोर पसार झाले. 

नववधूचे दागिने लंपासघटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिस अधीक्षक सुरवसे, उपनिरीक्षक रावते, खंदारे व इतर पोलीस अधिकारी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. घरातील नववधू प्रियांका यांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. सीसीटीव्ही फुटेज व अन्य पुरावे तपासण्यात येत आहेत. मागील दरोड्याशी साम्य शोधण्याचाही प्रयत्न सुरू आहे.

लग्नघरांना लक्ष्य करणारी टोळी ऑगस्ट-सप्टेंबर 2024 मध्ये याच परिसरात लग्नघरात झालेल्या एका दरोड्यात महिलांना जबर मारहाण करण्यात आली होती. त्या घटनेचा तपास अद्याप अपूर्ण असून, पुन्हा अशा स्वरूपाचा दरोडा पडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लग्न समारंभ करणाऱ्या कुटुंबांमध्ये विशेषतः असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांनी रात्रगस्त वाढवण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :RobberyचोरीNandedनांदेडJalanaजालनाPoliceपोलिस