जालना पोलीस संघ फुटबाॅल स्पर्धेत विजयी
जालना : फ्रेंड्स फुटबॉल क्लबच्या वतीने आयोजित फुटबॉल स्पर्धेच्या अंतीम सामन्यात जालना पोलीस संघाने विजय प्राप्त केला. अमजद खान यांनी गोल करून पोलीस संघाला विजय प्राप्त करून दिला. संघात राजू राणा, प्रवीण खंदारे, संजय घोरपडे, राजेश निर्मळ, नंदू घडसिंग, बोधीपाल मोरे, विजय निर्मळ, मधूकर जगधने, बबन पहुरे, सुधाकर शेंडगे, साई पवार, इरफान शेख, बाबा महाडकर आदींचा समावेश होता.
सिंधूताई सपकाळ यांच्या हस्ते मुख्यपृष्टाचे अनावरण
अंबड : येथील समाजभानचे दादासाहेब थेटे यांनी लिहिलेल्या हरवलेली माणसं या पुस्तकाच्या मुख्यपृष्टाचे सोमवारी पुणे येथे पद्मश्री पुरस्कार विजेत्या सिंधूताई सपकाळ यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. यावेळी कैलास उढाण, महेंद्र सुरासे, राधेश्याम अस्कंद यांच्यासह सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रातील नागरिकांची उपस्थिती होती. थोटे यांनी आपल्या साहित्यामध्ये मांडलेल्या विविध पैलूंचेही उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
धावडा परिसरामध्ये मेंढपाळांची भटकंती
धावडा : भोकरदन तालुक्यातील धावडा परिसरात सध्या मेंढ्यांचे कळप दिसून येत आहेत. बदलणारे वातावरण आणि वाढणारी उन्हाची तीव्रता यामुळे मेंढ्यांच्या चाऱ्यासाठी हे मेंढपाळ धावडा व शिवारामध्ये भटकंती करताना दिसून येत आहेत.
अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
जालना : चिंचोलीवाडी येथील गोरक्षनाथ गड संस्थामध्ये दि. ६ फेब्रुवारीपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात काकडा आरती, विष्णूसहस्त्रनाम, नवनाथ ग्रंथ पारायण, गाथा भजन तसेच ह.भ.प. गंगाधर महाराज ढेरे यांचे संगीतमय भागवत होणार आहे. दि. १३ रोजी रमेश महाराज वाघ यांच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होईल. सप्ताहाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष रामदास महाराज मुळे यांनी केले आहे.
अंबडमध्ये शिबिरात ४४ जणांचे रक्तदान
अंबड : जय स्वयंभू ग्रुपचे संस्थापक स्व. विलास लांजे यांच्या स्मरणार्थ आयोजित रक्तदान शिबिरात ४४ जणांनी रक्तदान केले. यावेळी शिवराज लांडे, परमेश्वर लांडे,
अमोल ठाकूर, गणेश लोहकरे, बाळासाहेब इंगळे, मच्छिंद. डोंगरे, अमोल वराडे, संतोष कोल्हे, गणेश खरात, कृष्णा शर्मा, अंशीराम लांडे, दादासाहेब थेटे आदी यांच्यासह
ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित
होते. यावेळी ग्रुपच्या व्यायाम
शाळेचा शुभारंभही करण्यात
आला.