शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 12:35 AM

शहरातील कदीम पोलीस ठाण्याच्या डागडुजीकडे होणारे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष तीन अधिका-यासह ७६ कर्मचाऱ्यांच्या जिवावर बेतण्याची वेळ आली आहे!

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील कदीम पोलीस ठाण्याच्या डागडुजीकडे होणारे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष तीन अधिका-यासह ७६ कर्मचाऱ्यांच्या जिवावर बेतण्याची वेळ आली आहे! पावसाचे पाणी मुरून ठाण्याच्या भिंती फुगल्या आहेत. यावर उपाय म्हणून पोलीस दलाच्या मार्फतच ठाण्यावर पत्र्याचे शेड आणि पीओपीचे काम हाती घेण्यात आले आहे.शहरातील संवेदनशील भागाचा सहभाग असलेल्या कदीम पोलीस ठाण्याचा भार ३ अधिकाºयांसह ७६ कर्मचाºयांच्या खांद्यावर आहे. ठाण्याची इमारत जुनाट असून, साधारणत: सन २०१० मध्ये ठाण्याची नूतन इमारत बांधण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठांमार्फत शासनाकडे पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यात मातब्बर नेतेमंडळी असली तरी तब्बल नऊ वर्षानंतरही या ठाण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे धोकादायक इमारतीतच जीव मुठीत घेऊन अधिकारी, कर्मचा-यांना दैनंदिन कामकाज करावे लागत आहे.गत काही दिवसांपासून शहरासह परिसरात पाऊस झाला. या पावसात ठाण्यातील वायरलेस कक्षातील पीओपीचे छत अचानक कोसळले. सुदैवाने या घटनेवेळी कोणताही अधिकारी, कर्मचारी या कक्षात नसल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी या ठाण्याची तात्पुरती डागडुजी करावी, याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पोलीस दलाच्याच वतीने ठाण्याच्यावर पत्र्याचे छत मारणे आणि नवीन पीओपी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, कदीम पोलीस ठाण्याची इमारत खूपच जुनी असून, भिंती ढासाळण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे केवळ डागडुजी करण्याऐवजी नवीन पोलीस ठाणे बांधावे किंवा इतरत्र ठाण्याचे स्थलांतर करावे, अशी मागणी कर्मचारी करीत आहेत.इतर इमारतीचा शोधकदीम ठाण्याच्या नवीन इमारतीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. सध्याची इमारत खिळखिळा झाली आहे. त्यामुळे इतर शासकीय विभागाच्या वतीने बांधण्यात आलेली आणि वापराविना मोकळी असलेली इमारत कदीम ठाण्यासाठी वापरता येईल. त्यानुसार अशा इमारतीचा शोध सुरू आहे.साधारणत: २०१७ मध्ये कदीम पोलीस ठाण्याच्या पाठीमागील बाजूस महिला कक्षाचे काम हाती घेण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस प्रशासनाच्या वतीने लाखो रुपयांचा निधी या बांधकामासाठी मंजूर होता. मात्र, हे काम अर्धवट स्थितीत असून, बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिका-यांचे याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे शासनाचा लाखोचा निधी मातीत गेल्याचे दिसून येते.महिला सुरक्षा कक्षही धोक्यातमोडकळीस येणा-या संसारात हस्य फुलविण्याचे काम महिला सुरक्षा कक्षाकडून केले जाते. मात्र, या कक्षाचे काम ज्या इमारतीत सुरू आहे. ती इमारतही खूपच जुनी झाली आहे. त्यामुळे या महिला सुरक्षा कक्षाचे कामकाजही इतर इमारतीत सुरू करण्याची गरज आहे.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेpwdसार्वजनिक बांधकाम विभाग