शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 01:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककेदारखेडा : परिसरात दिवसभर वाळूचा उपसा सुरु असताना उपसा एकीकडे आणि तहसीलदारासह महसूल विभागाच्या पथकाची कारवाई दुसरीकडे सुरु होती़ या पथकाने रिकाम्या उभ्या असलेल्या गाड्यांचा पंचनामा केला़ तहसीलच्या पथकाने केवळ देखावा करत रिकाम्या गाड्यांवर कारवाईचा फार्स केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.पूर्णा नदीपात्रातून दिवसाढवळ्या वाळू उपसा करण्यात येत असल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्ककेदारखेडा : परिसरात दिवसभर वाळूचा उपसा सुरु असताना उपसा एकीकडे आणि तहसीलदारासह महसूल विभागाच्या पथकाची कारवाई दुसरीकडे सुरु होती़ या पथकाने रिकाम्या उभ्या असलेल्या गाड्यांचा पंचनामा केला़ तहसीलच्या पथकाने केवळ देखावा करत रिकाम्या गाड्यांवर कारवाईचा फार्स केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.पूर्णा नदीपात्रातून दिवसाढवळ्या वाळू उपसा करण्यात येत असल्याने याबाबत मंगळवारी लोकमतने वृत्त प्रकाशीत केले होते. यामुळे तहसीलदार योगिता कोल्हे यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली खरी, मात्र ज्या भागात वाळू उपसा सुरु आहे तो परिसरात सोडून दुसरीकडेच कारवाई केली आहे. वाळू माफिया व महसूल आणि पोलिसांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे हा वाळूचा उपसा जोरात सुरू असल्याचे बोलले जात आहे. भोकरदन येथे तहसीलदार योगिता कोल्हे रुजू होताच वाळू माफियांमध्ये घबराट निर्माण झाली होती़ अनेक ठिकाणी त्यांनी अवैध वाळू उपशाच्या विरोधात धडाकेबाज कारवाई करून स्वत:ची ओळख निर्माण केली होती. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या कारवाया अचानक थंडावल्या आहेत. त्यामुळे महसूल खाते भर दिवसा सुरु असलेल्या वाळू उपशाकडे कानाडोळा करीत आहे़ ही यंत्रणा मूग गिळून गप्प का, असा सवालही सर्वसामान्यांतून होत आहे़ वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.नुसताच गाजावाजा : कारवाईच्या वेळी बघ्यांची गर्दीबुधवारी सायंकाळी तहसीलदार योगिता कोल्हे आणि त्यांच्या पथकाने कारवाईचा मोठा देखावा करत रिकाम्या उभ्या असलेल्या हायवा गाड्यांचा पंचनामा केला़ हा पंचनामा सुरु असताना तहसीलदारांची कारवाई सुरु असल्याने बघ्यांनी मोठी गर्दी केली होती़ मात्र कारवाई सुरु असलेल्या हायवा ट्रकमध्ये वाळू नसल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. अशा प्रकारे पोकळ कारवाईमुळे नागरिकही हैराण झाले आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :Tahasildarतहसीलदारsandवाळू