शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

महसूल विभागाची धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:28 AM

शनिवारी महसूल पथकाने सकाळी गंधारी येथील गोदापात्रात धडक कारवाई करत अवैध वाळूउपसा करत असलेले तीन पोकलेन आणि एक हायवा टिप्पर जप्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : तालुक्यातील गोदाकाठी वाळू माफियांच्या अवैध वाळूउपसा व तस्करी संदर्भात शनिवारी लोकमतने वृत्त प्रकाशित करताच महसूल प्रशासन खडबडून जागे झाले. शनिवारी महसूल पथकाने सकाळी गंधारी येथील गोदापात्रात धडक कारवाई करत अवैध वाळूउपसा करत असलेले तीन पोकलेन आणि एक हायवा टिप्पर जप्त केले.या कारवाईमुळे वाळू माफियांत खळबळ उडाली. मात्र, शनिवारी वाळू माफियांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये नेहमीप्रमाणे महसूल व पोलीस यंत्रणेमध्ये समन्वयाचा अभाव असल्याची बाब पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आली.सकाळी अंबडचे तहसीलदार दत्तात्रय भारस्कर यांच्या आदेशाने महसूल विभागाचे नायब तहसीलदार संदीप ढाकणे, शहागड महसूल मंडळ अधिकारी पी. डी. शिंदे, तलाठी श्रीपाद देशपांडे, ए. ए. देशमुख, एस. पी. घनघाव, पी. एन. गजरे, के. डी. मुजगूले, कोतवाल अशोक शिंदे, संदीप धारे, शाम विभुते, विकी केदार, योगेश कुरेवाड आदींच्या पथकाने गंधारी येथील वाळूघाट गाठला.यावेळी सदरील वाळूघाटात अनेक यंत्रांच्या मदतीने बेकायदेशीरपणे उपसा सुरु असल्याचे आढळले. या पथकाला पाहताच वाळू घाटातील दुसऱ्या बाजूच्या वाळू तस्करांनी आपाआपली वाहने, पोकलेन, जेसीबी, यांत्रिक बोटी, केनी यंत्र घेऊन पळ काढला.गंधारी येथे जप्त करण्यात आलेली यंत्रसामुग्री व हायवा टिप्पर महसूल पथकाने गोंदी पोलिसांच्या ताब्यात दिले.यानंतर पथकाने कुरण, हसनापूर, इंदलगाव, गोंदी इ. गावांच्या गोदाकाठाची पाहणी केली.वाळू माफियांविरोधातील मोहीम यापुढेही अशाच पद्धतीने सुरु राहणार आहे. अवैध उपसा व वाहतूक करणाºयांची कदापिही गय केली जाणार नाही, अवैध वाळू तस्करी करणाºयांवर कठोर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे तहसीलदार दत्तात्रय भारस्कर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.महसूल विभागाचे पथक गोदापात्रात उतरल्याची बातमी वाºयासारखी वाळू माफियांपर्यंत पसरली. बातमी पसरताच इतर ठिकाणच्या वाळू तस्करांनी साहित्य घेऊन पोबारा करण्यातच धन्यता मानली.औरंगाबाद, जालना व बीड येथून येणाºया हायवा, टिप्पर इ. वाहनांना कारवाईची माहिती मिळताच सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. महसूल पथक इतर ठिकाणी धाडी टाकण्याच्या तयारीत असल्याची वाळू तस्करांपर्यंत माहिती पोहोचली, त्यामुळे शनिवारी वाळू तस्करांनी गोदापात्राकडे जाण्याचे धाडस केले नाही.

टॅग्स :Governmentसरकारsandवाळू