जालना जिल्ह्याला चालू आर्थिक वर्षात जमीन महसूल तसेच गौण खनिज असे दोन्ही मिळून हे उद्दिष्ट दिले आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सर्व यंत्रणांची दर महिन्याला आढावा बैठक घेऊन महसूलचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच ते कसे पूर्ण करावे या बाबतही त्यांनी मार्गदर्शन केले होते. जिल्ह्याला जमीन महसुलाचे एकूण १४ कोटी ४ लाख रूपये येणे होते. त्या पैकी १२ कोटी ७ लाख रूपये वसूल झाले असून , याची टक्केवारी ९३ टक्के येते. गौण खनिजच्या माध्यमातून जवळपास ७० कोटी ५० लाख रूपये येणे अपेक्षित होते, पैकी ४८ कोटी ७१ लाख रूपयांची वसुली झाली असून, ती ६९ टक्के होते.
चौकट
तालुकानिहाय वसुली
जालना - ९ कोटी, बदनापूर - एक कोटी ४५ लाख, भोकरदन- ५ कोटी ८१ लाख, जाफराबाद- ३ कोटी २७ लाख, परतूर- ६ कोटी ३० लाख, मंठा- ४ कोटी ६७ लाख, अंबड - २ कोटी ३२ लाख आणि घनसावंगी १ कोटी ८० लाख रूपये वसूल झाले आहेत.
चौकट
वाळू लिलावाने टक्का वाढला
गेल्या वर्षभरापासून पर्यावरण समितीच्या मान्यतेत अडकलेले जिल्ह्यातील २२ वाळू घाटांचे लिलाव यंदा झाले. पैकी नऊ वाळू घाटांचे पहिल्या टप्प्यात लिलाव झाले. यातून मोठा महसूल मिळाल्याने देखील महसूलची टक्केवारी वाढली आहे. उर्वरित वसुली पूर्ण करण्यासाठी देखील जिल्हाधिकारी बिनवडे यांनी नुकतीच सर्व महसूल अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्याचे सांगण्यात आले.