शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं.च्या सामान्य फंडात ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 00:55 IST

१२२ ग्रामपंचायतींपैकी अर्ध्याहून जास्त ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामसेवकांनी गावातील करवसुलीकडे लक्ष न दिल्याने ग्रामपंचायतींच्या सामान्य फंडात ठणठणात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गजानन वानखडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तालुक्यातील १२२ ग्रामपंचायतींपैकी अर्ध्याहून जास्त ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामसेवकांनी गावातील करवसुलीकडे लक्ष न दिल्याने ग्रामपंचायतींच्या सामान्य फंडात ठणठणात असल्याचे सूत्रांनी सांगितले.ग्रामपंचायत कार्यालयाचे वार्षिक नियोजन सामान्य फंडावर अवलंबून असते. कारण गावातून जमा होणाऱ्या विविध करामधून ग्रामपंचायत कर्मचा-यांचे मानधन, पथदिवे लावणे, गावातील नाल्यांची साफसफाई, याशिवाय वेळेवर येणारी कामे सुध्दा सामान्य फंडातून करावा लागतो. मात्र तालुक्यातील अर्ध्याहून जास्त ग्रामपंचायतीच्या सामान्य फंड खाते निरंक आहे. मात्र सरपंच आणि ग्रामसेवकाने कर वसुलीसाठी म्हणावे तसे प्रयत्नच करण्यात येत नसल्याने याचा परिणाम ग्रामपंचायत विकासावर झाला आहे. गावागावा राजकीय हस्तक्षेपामुळे सुध्दा कर वसुलीस मर्यादा येत असल्याचे सागण्यात येत आहे.यामुळे अनेक गावात पथदिवे नसल्याने अंधाराचे साम्राज्य आहे. विशेष म्हणणे सामान्य फंडात पैशाअभावी ग्रामपंचायत कर्मचा-यांचे मानधन सुध्दा वर्षानुवर्ष प्रलंबीत राहत आहे. यामुळे कर्मचा-यांना संसाराचा गाडा घाकणे दिवसेदिवस कठीण झाले आहे. अनेक वेळा गटविकास अधिका-याकडून गावस्तरावर कर वसुलीसाठी प्रयत्न करण्यात येतात. मात्र कर भरण्यास नागरिकांची सुध्दा उदासिनता असल्याने म्हणावी तशी वसुली होण्यास अडचणी येत असल्याने सांगण्यात येत आहे. ग्रामपंचायतीकडून गावात पिण्याच्या पाणी, दिवाबत्ती, रस्ते दुरूस्ती आदी कामे करण्यात येतात. ग्रामपंचात कडून विविध सुविधा पुरविल्यानंतर सुध्दा नागरिकाकडून कर भरण्याबाबात दुर्लक्ष करण्यात येते. परिणामी ग्रामसेवकांनी कर वसुलीबाबात केलेल्या प्रयत्नासुध्दा यश येत नाही. परिणामी वसुली रखडली जात असल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतfundsनिधी