शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

अवैध वाळू उपसा प्रकरणात जालन्यात अधिकाऱ्यांचे जबाब नोंदविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 14:10 IST

अधिकाऱ्यांचे सीडीआर तपासणार 

ठळक मुद्दे३ कंत्राटदारांचीही चौकशीजिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे आणि निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी चौकशी करून जबाब नोंदवले.

जालना : जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा प्रकरणात गुंतलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बुधवारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे आणि निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी चौकशी करून जबाब नोंदवले. याचवेळी त्या भागातील तीन वाळू कंत्राटदारांचीही चौकशी करण्यात आली. गेल्या वर्षभरातील या अधिकाऱ्यांच्या मोबाईलचे सीडीआर तपासण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

जालना आणि बीड जिल्ह्यांतून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूचा उपसा होत असल्याचा मुद्दा विधानसभेत गाजला. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बीड आणि जालना जिल्ह्यांतील महसूल तसेच पोलीस दलातील वाळूशी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी  करण्याचे निर्देश दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.  त्यानुसार बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी बिनवडे आणि निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी सर्व अधिकाऱ्यांना बोलावून घेत चौकशी केली. त्यातील वास्तव काय आहे, हे त्यांच्याकडून जाणून घेतले. यावेळी आर्थिक देवाणीचा आरोप अधिकारी, कर्मचाऱ्यांवर करण्यात आला आहे. त्यात तथ्य नसल्याचा दावा संबंधित चौकशीस सामोरे जाणाऱ्या अधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र, एवढ्यावर समाधान न मानता या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मोबाईलचा गेल्या वर्षभरातील सीडीआर तपाण्यावरही विचार झाल्याचे सांगण्यात आले. 

तुषार निकम यांनी गौण खनिज विभागाचा पदभार घेऊन एक महिना झाला असल्याचे सांगण्यात आले. चंडोल हे भोकरदन येथून महिन्याभरापूर्वीच अंबड येथे बदलून गेले आहेत. त्यामुळे आमचा या प्रकरणांशी संबंध नसल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी ज्यांच्याकडे जिल्हा गौण खनिज अधिकाऱ्यांचा पदभार होता, त्यांचीही चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. अवैध वाळू उपसाप्रकरणी तत्कालीन गौण खनिज अधिकारी पाटील आणि नायब तहसीलदार संदीप ढाकणे हे निलंबित झाले होते. त्यांना तत्कालीन आयुक्तांनी निलंबित केले होते. त्यांनी त्यांच्या या निलंबनाला मॅटमध्ये आव्हानही दिले आहे. 

वाळूमाफियांना नऊ कोटींचा दंडवर्षभरात अवैध वाळूचा उपसा रोखण्यासाठी महसूल तसेच पोलिसांनी विशेष मोहीम राबवून जवळपास १९४ प्रकरणांमध्ये १०३ गुन्हे दाखल केले असून, त्यांना ८ कोटी ७५ लाखांचा दंड आकारला आहे. त्यापैकी ८७ लाख २४ हजार रूपये वसूल करण्यात आले आहेत. गेल्या वर्षभरात दहा अधिकाऱ्यांवर वाळूमाफियांनी हल्ले केले असून, त्याप्रकरणी दहा जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात एका वाळूमाफियाविरूद्ध एमीडीएअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

यांची झाली चौकशी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, अंबडच्या तहसीलदार मनीषा मेने, घनसावंगीचे तहसीलदार चंद्रकांत शेळके, जिल्हा गौण खनिज अधिकारी तुषार निकम, नायब तहसीलदार वंदना शंडूलकर, वाय.एन. दांडगे, बी.के. चंडोल, संदीप मोरे, मंडळ अधिकारी दिगंबर कुरेवाड, पोलीस निरीक्षक शशिकांत देवकर, अनिरुद्ध नांदेडकर, अतुल एरमे, शैलेश रायकर, रामदास राख, नासीर मुसा सय्यद.

टॅग्स :sandवाळूJalanaजालनाJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाCrime Newsगुन्हेगारी