जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या २९ जणांना यशस्वी उपचारानंतर शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला. शुक्रवारीच २१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या १३ हजार ३२४ वर गेली असून, आजवर ३५३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर आतापर्यंत १२ हजार ७७१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
बाधितांमध्ये जालना शहरातील ७, तर तालुक्यातील मानेगाव १, मोतीगव्हाण येथील एकाला कोरोनाची बाधा झाली. परतूर शहरातील चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. घनसावंगी तालुक्यातील बोररांजणी १, तर अंबड शहरातील एकाला कोरोनाची लागण झाली. बदनापूर तालुक्यातील आन्वी १, बाजार वाहेगाव १, नूर रुग्णालय १, राजेवाडी येथील एकाला कोरोनाची बाधा झाली. जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी येथील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात १९ हजार ४७७ जण संशयित आहेत. शुक्रवारी ३३२ जणांचा स्वॅब प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला होता. त्यापैकी २७८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला, तर २१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.