महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची मानव विकास योजनेंतर्गत शालेय मुलींसाठी तालुक्यात सेवा सुरु होती. मात्र परतूर पासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर असलेल्या वाढोणा गावात स्वातंत्र्य काळापासून बस येत नसल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज पायपीट करावी लागत होती. गावामध्ये बस नसल्याने ग्रामस्थांनाही खासगी वाहनाने प्रवास करावा लागत होता. या गावात बसची सेवा नसल्यामुळे गावातील गोरगरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यास अनंत अडचणी येत होत्या. मात्र या गावातील शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या वाढल्याने माजी मंत्री विद्यमान आमदार बबनराव लोणीकर तसेच भाजयुमोचे महामंत्री राहुल लोणीकर यांनी पुढाकार घेऊन आगार व्यवस्थापकाकडे मानव विकास मिशन बस सुरू करण्याबाबत प्रयत्न केले होते. या मागणीला प्रतिसाद देत आगार व्यवस्थापक डी. एम. जाधव यांनी बस सुरु करण्याचे मान्य करून गुरुवारी गावात बस सुरू करण्यात आली. गावात बस येताच विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करीत बसचे जल्लोषात स्वागत केले.
वाढोणा येथे चालक व वाहकाचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:41 IST