जालना व बदनापूर तालुका जि.प. शिक्षक सहकारी पतसंस्थेविरूध्द काही विपर्यास बातम्या प्रकाशित झाल्या आहे. त्या पार्श्वभूमीवर पतसंस्थेचे चेअरमन मंगेश जैवाळ यांनीही पतसंस्थेची बाजू मांडली. यावेळी सचिव अरूण जाधव, संचालक संतोष कुमफळे, शांतीलाल गोरे, परमेश्वर मोरे, जगन्नाथ शिंदे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. पतसंस्थेचा कारभार अत्यंत पारदर्शक असून, आम्ही संस्थेच्या प्रगतीसाठीच काम करीत आहोत. मे २०२० अखेर नऊ कोटींच्या जवळपास असलेल्या सभासद ठेवींमध्ये ४४ टक्के वाढ होवून आजमितीस संस्थेकडे १३ कोटी ६०० लाख रूपयांची ठेव आहे. संस्थेने सभासदांना २२ लाख रूपयांचे संरक्षण कवच दिले आहे. मागील काही वर्षापासून संस्थेच्या लेखा परीक्षणासही संस्थेविषयी गंभीर स्वरूपाचे शेरे नोंदवले नाहीत. सन २०१९-२० या आर्थिक वर्षात संस्थेने सभासदांना ९ टक्के लाभांश वाटप केल्याचेही त्यांनी सांगितले.
कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार- मंगेश जैवाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:25 IST