शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रावसाहेब दानवेंच्या गावात रेल्वे इंजिन येणार; अधिकाऱ्यांनी तीन ठिकाणची केली पाहणी

By महेश गायकवाड  | Updated: June 8, 2023 16:10 IST

रेल्वेचा विस्तार झाला असून, अनेक ठिकाणी रेल्वे विजेवर धावत आहे. त्यामुळे डिझेल इंजिनवर धावणाऱ्या रेल्वे बंद झाल्या आहेत.

भोकरदन : शहराच्या सौंदर्यात लवकरच रेल्वेचे इंजिन भर घालणार आहे. शहर शुशोभीकरणाच्या दृष्टीने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रेल्वे विभागाकडे कार्यरत नसलेल्या रेल्वे इंजिनची मागणी केली आहे. हे रेल्वे इंजिन बसविण्यासाठी रेल्वे विभागाच्या नांदेड डिव्हिजनच्या अधिकाऱ्यांनी ७ जून रोजी शहरात तीन ठिकाणी जागेची पाहणी केली आहे.

 केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे रेल्वे राज्यमंत्री पद आहे. त्यांनी रेल्वे विभागाला भोकरदन व जालना शहरात रेल्वे इंजिन बसविण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी ७ जून रोजी आमदार संतोष दानवे यांची भेट घेऊन तीन स्थळांची पाहणी केली. यावेळी नांदेड रेल्वेचे सिनिअर डिव्हिजन ऑफिसर जितेंद्र कुमार, सिनिअर सेक्शन इंजिनिअर प्रदीप व्यवहारे, गटविकास अधिकारी गजानन सुरडकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष वाघमारे यांची उपस्थिती होती.

रेल्वेबद्दल आपुलकी निर्माण वाढेलरेल्वेचा विस्तार झाला असून, अनेक ठिकाणी रेल्वे विजेवर धावत आहे. त्यामुळे डिझेल इंजिनवर धावणाऱ्या रेल्वे बंद झाल्या आहेत. हे डिजेल इंजिन विविध शहरांतील सुशोभीकरणासाठी व पर्यटन स्थळाच्या ठिकाणी बसविण्यात येत आहे. रेल्वेबद्दल आपुलकी निर्माण होण्याबरोबरच शहराच्या सुशोभीकरणात यामुळे भर पडणार आहे. भोकरदन शहरात बसिवण्यात येणाऱ्या रेल्वे इंजिनची लांबी ११.२५ मीटर, रुंदी २.५ मीटर व उंची ३.५ मीटर असणार आहे. या रेल्वे इंजिनचे वजन ३७ टन असणार आहे.- जितेंद्र कुमार, सिनिअर डिव्हिजन ऑफिसर

शहर सुशोभीकरणाला मदतकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या विशेष प्रयत्नातून जालना येथे दोन इंजिन आणण्यात येणार आहे. यामुळे शहर सुशोभीकरणाला मदत होईल. भोकरदन व जालना या दोन ठिकाणी १ ते २ महिन्यांत हे इंजिन बसविण्यात येणार आहे.- संतोष दानवे, आमदार

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेrailwayरेल्वेtourismपर्यटन