शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका, सजवलेल्या बैलगाडीतून पाहणीवर राजू शेट्टी संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 18:30 IST

पालकमंत्री अतुल सावे यांनी रविवारी जालना जिल्ह्यातील विविध भागात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. अंबड तालुक्यातील दौऱ्यात ते सजवलेल्या बैलगाडीतून बांधावर गेले.

- राजू छल्लारेवडीगोद्री (ता.अंबड) : नुकसानीच्या पंचनाम्याचे नाटक कशाला, आता मदत द्या. विमा कंपन्यांना विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम द्यायला सांगा. खरीप पिकांची सगळी राखरांगोळी झाली, हे काय विमा कंपनीला समजत नाही का? असा खडा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी सजवलेल्या बैलगाडीतून शेतकऱ्यांच्या पीक नुकसानाची पाहणी केल्यामुळे त्यांच्यावर त्यांनी यावेळी  टीका केली. अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या. याप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. 

पालकमंत्री अतुल सावे यांनी रविवारी जालना जिल्ह्यातील विविध भागात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. अंबड तालुक्यातील दौऱ्यात ते सजवलेल्या बैलगाडीतून बांधावर गेले. त्यामुळे  राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना मदत देता येत नाही तर किमान त्यांच्या जखमेवर मीठ तरी चोळू नका, अशा शब्दात टीका केली. जालना जिल्ह्यात मागील दोन महिन्यांत अतिवृष्टीमुळे खरीप पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, त्या नुकसानीचे ना पंचनामे ना मदत मिळाली. आता परत परतीच्या पावसाने धुमाकूळ घालत सोयाबीन, तूर, कपाशी, बाजरी, मक्का, मोसंबी, द्राक्ष व डाळिंब आदी फळपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीत शेतकऱ्यांना शासनाने आधार देणे गरजेचे असताना पालकमंत्री शेतकऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालण्याऐवजी मीठ चोळण्यासाठी फिरत आहेत काय?, असा सवाल राजू शेट्टी यांनी अतुल सावे यांना केला आहे.

नुकसानीच्या पंचनाम्याचे नाटक कशाला, आता मदत द्या. विमा कंपन्यांना विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम द्यायला सांगा. खरीप पिकांची सगळी राखरांगोळी झाली. हे विमा कंपनीला समजत नाही का? तक्रार करून देखील विमा कंपन्या लक्ष देत नसतील तर सरकार करतं तरी काय? असा प्रश्न राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.  यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे, जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, राजेंद्र खटके, विद्यार्थी आघाडी जिल्हाप्रमुख गणेश गावडे, शिवाजी लहाने, बाबासाहेब दखणे, बप्पासाहेब काळे, अंकुश तारख, रामेश्वर लहाने, विष्णू नाझरकर, गणेश कव्हळे, अजय काळे, लक्ष्मण उघडे, धनराज चिमणे, शुभम सोळंके, मंगेश लहाने, प्रवीण लहाने, योगेश नाझरकर आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :JalanaजालनाRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी