शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

राजेंद्रसिंह गौर यांना पोलीस पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:37 IST

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल त्यांना पोलीस पदक जाहीर झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल त्यांना पोलीस पदक जाहीर झाले आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षामध्ये गौर व त्यांच्या पथकाने चोरी, दरोडा, खुन आदी श्रेत्रात यशस्वी तपास केल्याबद्दल त्यांना हे पोलीस पदक बहाल करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेसह २००३ मध्ये पोलीस कर्तव्य मेळाव्यात घातपात विरोधी तपासणीत चांगली कामगिरी करत गौर अव्वल राहिले होते. त्यांनी औरंगाबाद येथे दहशतवाद विरोधी पथकातही उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यांच्या एकूणच कर्तव्यदक्षतेची दखल हे पारितोषिक देताना घेण्यात आली. गौर यांनी यापूर्वी हिंगोली, जालना, लातूर जिल्ह्यातील किल्लारी यासह विविध ठिकाणी सेवा बजावली आहे. जालना येथील कदीम जालना पोलीस ठाण्याला आयएसओ नामांकन प्राप्त करुन देताना देखील त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. गौर यांचे शिक्षण परभणी कृषी विद्यापीठात त्यांनी बीएससी अ‍ॅग्री पूर्ण केले आहे. नाशिक येथे पोलीस प्रशिक्षणा दरम्यान, त्यांनी द्वितीय क्रमांक मिळविला होता. पोलीस उपनिरीक्षक म्हणून ते पोलीस दलात रुजू झाले होते. हे पदक मिळाल्याबद्द्ल गौर यांचे पोलीस अधीक्षक एस. चैतन्य आणि अन्य मान्यवरांनी स्वागत केले आहे.

टॅग्स :Jalna Policeजालना पोलीसIndependence Dayस्वातंत्र्य दिवस