शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत पावसाची आतषबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 00:15 IST

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. सोयाबीन आणि कपाशीला याचा मोठा फटका बसला आहे. या परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले असून, जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी नव्यानेच निवडून आलेले आ. कैलास गोरंट्याल तसेच आ. राजेश टोपे आणि माजी आ. अर्जुन खोतकरांनी केली आहे.जालना जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरी एवढाही पाऊस पडतो की, नाही अशी चिंता होती. परंतु पंधरा दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने मोठी मुसंडी मारून जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. दरम्यान, यापूर्वीच भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात जोरदार पाऊस झाला होता. परंतु अन्य सहा तालुक्यांमध्ये पावसाने पाठ फिरवली होती. यामुळे या भागात दुष्काजन्य स्थिती होती. ती आता दूर झाली असून, आता सोयाबीनची सोंगणी आणि कपाशी काढणीला या पावसामुळे मोठा फटका बसला आहे.परतीच्या पावसामुळे सर्वात जास्त फटका सोयाबीनला बसला असून, कपाशीच्या कैºयातून पुन्हा कोंब निघाल्याने शेतकऱ्यांचे पांढरे सोने काळवंडले आहे. जालना तालुक्यातील कडवंची, नंदापूर, धारकल्याण, पीरकल्याणसह रामनगर परिसरातील द्राक्ष बागांनाही मोठा फटका बसला आहे. या नुकसानीचे दिवाळी सणाचे कारण न देता तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत अशी मागणी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदारांशी चर्चा करताना केली. तसेच आमदार राजेश टोपे यांनी देखील या संदर्भात एक निवेदन दिले असून, त्यात त्यांनी जिल्हाधिका-यांनी पथक नेमून पंचनामे करावे अशी मागणी केली आहे.परतीच्या पावसाने ज्या गावांमध्ये नुकसान झाले आहे, त्या नुकसानाची माहिती एकत्रित करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश कृषी विभागाने त्यांच्या तालुका पातळीवरील अधिकाºयांना या पूर्वीच दिले आहेत.तसेच पीकविमा कंपनीच्या अधिका-यांनी देखील तातडीने ज्या गावातून पीकविमा काढलेला आहे, अशा गावात जाऊन नुकसानीची पाहणी करावी, असेही कृषी विभागाने विमा कंपन्यांना सांगितले आहे.

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीRevenue Departmentमहसूल विभाग