शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महिन्याच्या प्रतीक्षेनंतर वरुणराज अखेर प्रसन्न !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 00:59 IST

महिन्याभराच्या प्रतिक्षेनंतर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात वरुणराजाने शनिवारी कृपा केली. परिणामी, शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळाले असून, या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महिन्याभराच्या प्रतिक्षेनंतर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात वरुणराजाने शनिवारी कृपा केली. परिणामी, शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळाले असून, या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.पावसाळा सुरु होऊन तब्बल एका महिन्यांचा कालावधी झाला आहे. मात्र, जिल्ह्यात अद्यापही जोरदार पाऊस बरसला नव्हता. परिणामी, जिल्ह्यातील पेरण्या व लागवड खोळंबली होती. जिल्ह्यात जूनच्या सुरुवातीला हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. या पावसावरच काही शेतक-यांनी पेरण्या व लागवड केली होती. तर काही शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत होते. परंतु गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे रिमझिम पाऊसही पडत होता. परंतु जोरदार पाऊस झाला नाही. शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील जालना, परतूर, मंठा, जाफराबाद, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, अबंड या सर्वच तालुक्यात जोरदार पाऊस बरसला. तब्बल एक ते दोन तास झालेल्या या पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले. जालना शहरातील नाल्या भरुन वाहिल्या. त्यामुळे वाहनधारकांची चांगलीच ताराबंळ उडाली. दरम्यान, या पावसामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले असून, जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे. महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर जोरदार पाऊस बरसल्यामुळे शेतक-यांच्या चेह-यावर आनंद झळकणार आहे.खरिपाच्या पिकांना तारलेजिल्ह्यात महिन्याभरापासून जोरदार पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे शेतक-यांची पिके करपून गेली होती. परंतु , गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात रिमझिम पाऊस पडत होता. त्यातच शनिवारी जोरदार पाऊस झाल्याने शेतकºयांच्या खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे.शेतकरी सुखावलापावसाळा सुरु होऊन एक महिन्याचा कालावधी उलडला आहे. परंतु, अद्यापही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नव्हता. त्यामुळे अनेंक शेतक-यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. परिणामी, शेतकरी चिंतेत सापडला होता.पाऊस : परतूर, भोकरदन जोरदार बरसलापरतूर : शहरात दोन ते तीन तास जोरदार पाऊस बरसल्यामुळे शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. या पावसामुळे शहरातील सर्वच रस्ते चिखलमय झाल्याने मोटार सायकल, स्कूटी सारखी वाहने बंद पडल्याचे प्रकार घडले. दरम्यान, या पावसामुळे शहरातील नागरिकांची तारांबळ उडाली होती.भोकरदन तालुक्यात शनिवारी चार वाजेच्या सुमारास सर्वदुर समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले असून शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे़ तालुक्यात गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने डोळे वटारल्यामुळे खरिपाच्या मका, सोयाबीन, कापूस या पिकांनी माना टाकल्या होत्या. त्यामुळे शेतक-यांनी शेतीवर करण्यात येणा-या खर्चाला सुध्दा आखडता हात घेतला होता. मात्र या पावसाने भोकरदनसह तालुक्यातील धावडा, वालसांवगी, पारध, जळगाव सपकाळ, आन्वा, हिसोडा, पिंपळगाव रेणुकाई, दानापुर, आव्हाना, केदारखेडा, राजुर, पिंपळगाव कोलते, तळेगाव, नळणी, सिपोरा बजार यासह तालुक्यातील सर्वच भागात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी