शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

जालना-जळगाव रेल्वे मार्गाला रावसाहेब दानवेंचा हिरवा कंदील, लवकरच सुरू होणार सर्वेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 11:17 IST

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिली आहे.

जालना :जालनाजळगाव जिल्ह्यांतील व्यापाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना - जळगाव रेल्वे मार्गाला हिरवा कंदील दाखविला असून, या मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आली आहे. सहा महिन्याच्या आत हे सर्वेक्षण केले जाणार असून, त्यानंतर कामासाठी निधी मंजूर केला जाणार असल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

जालना व जळगाव येथे मोठी बाजारपेठ आहे. दोन्ही जिल्ह्यांतील व्यापाऱ्यांना एसटी किंवा खासगी वाहनाने ये-जा करावी लागते. त्यामुळे व्यापाऱ्यांची मोठी गैरसोय होते. जालना ते जळगाव रेल्वे मार्ग व्हावा, अशी मागणी काही व्यापाऱ्यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली होती. या मागणीवर चर्चा करून दानवे यांनी या मार्गाला हिरवा कंदील दाखविला असून, या मार्गाचे सर्वेक्षण करण्याला मंजुरी दिली आहे.

त्यासाठी ४ कोटी ३५ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सहा महिन्याच्या आत हे सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. हा मार्ग जालना, राजूर, भोकरदन, सिल्लोड मार्ग जाणार जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. लवकरच सर्वेक्षणाच्या कामाला सुरूवात केली जाणार आहे. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

टॅग्स :JalanaजालनाJalgaonजळगावraosaheb danveरावसाहेब दानवे