शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

विकास कामांसाठी २६६ कोटींची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:44 IST

जालना पालिकेचा २०१९-२० यावर्षासाठीचा अर्थसंकल्प नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी बुधवारी सादर केला. हा अर्थसंकल्प दोन लाख तीन हजार रूपपये शिलकिचा असून, पालिकेचे उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळ्या घटकांमध्ये किरकोळ स्वरूपाची वाढ करून उत्पनवाढीवण्यावर भर दिल्याची माहिती नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी दिली.

ठळक मुद्देजालना पालिका : दोन लाख रूपये शिलकीच्या अर्थसंकल्पास मंजूरी

जालना : जालना पालिकेचा २०१९-२० यावर्षासाठीचा अर्थसंकल्प नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी बुधवारी सादर केला. हा अर्थसंकल्प दोन लाख तीन हजार रूपपये शिलकिचा असून, पालिकेचे उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळ्या घटकांमध्ये किरकोळ स्वरूपाची वाढ करून उत्पनवाढीवण्यावर भर दिल्याची माहिती नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी दिली. यावेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनीही महत्वाच्या सूचना मांडल्या.जालना पालिकेची विशेष सर्वसाधारण सभा सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली. यावेळी चालू वर्षात मालमत्ता करातून ४२ कोटी ९० लाख रूपये, जालना नगर पालिकेच्या विविध मालमत्तांच्या माध्यमातून भाडे आणि लिझ मधून जवळपास १० कोटी रूपये, पालिकेकडे असलेल्या जमा रकमेवरील व्याजातून दोन कोटी १७ लाख रूपये मिळणे अपेक्षित आहेत. यासह पाणीपुरवठा योजनेची देखभाल आणि दुरूस्ती, स्वच्छता, शिक्षण, घनकचरा प्रकल्प आदींसाठी या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे.दरम्यान जालना पालिकेचा अस्थानावरील खर्च हा ५२ कोटी ५७ लाख, प्रशासकीय खर्च १९ कोटी २६ लाख, मालमत्तेची देखभाल दुरूस्तीवर जवळपास ९० लाख रूपये खर्च दर्शविण्यात आला आहे.एकूणच जमा आणि खर्चाचा ताळमेळ बसवण्यात आला असून, पुढील वर्षासाठी २६६ कोटी १३ लाख रूपयांची तरतूद केली असल्याचे सांगण्यात आले.पालिका : अर्थसंकल्पावर चर्चाएकूणच अर्थसंकल्पावर साधक-बाधक चर्चा करण्यात आली. यावेळी महावीर ढक्का, विष्णू पाचफुले, शाह आलमखान, विजय चौधरी, रावसाहेब राऊत यांनी त्यांच्या भागातील प्रश्न मांडले. तसेच ढक्का यांनी मालमत्ता कर वसूलीसाठी ज्यावेळी नाके होते, त्यासाठी धनलक्ष्मी संस्थने ५० लाख रूपयांची ठेव ठेवली होती. ती परस्पर तोडण्यात आल्याचा आरोप केला. शाह आलमखान यांनीही शहरातील मालमत्तांकडे पालिका प्रशासाने लक्ष देण्याची मागणी केली. यावेळी पाचफुले यांनी झोपडपट्टीत घरांचे नामांतर करताना पालिकेकडून अडवणूक करून नागरिकांकडून पैसे घेतले जात असल्याचा गंभीर आरोप केला. यावेळी संगीता गोरंट्याल तसेच मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी सदस्यांचा प्रश्नांना समपर्कक उत्तरे दिली.

टॅग्स :JalanaजालनाJalana Muncipalityजालना नगरपरिषद