शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

समृध्दी महामार्ग: आरोपींना पोलिस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 01:23 IST

अंबड येथे एका महिलेच्या नावाने जीपीओ कुलमुख्त्यार पत्र तयार करणाऱ्यासह दोन साक्षीदारांना कदीम पोलिसांनी अटक केली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मुंबई ते नागपूर हा समृध्दी महामार्ग जालन्यातून जात आहे. तो जिल्ह्यातील २५ गावातून जात असून, यासाठी जमीन संपादन करताना अनेक ठिकाणी भूखंड घोटाळा झाला होता.या संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. त्यात तथ्य असल्याचे आता समोर आले असून, यात अंबड येथे एका महिलेच्या नावाने जीपीओ कुलमुख्त्यार पत्र तयार करणाऱ्यासह दोन साक्षीदारांना कदीम पोलिसांनी अटक केली आहे. यातील आरोपींना गुरूवारी न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.जालना तालुक्यातील पानशेंद्रा येथील गट क्रमांक ४१ मधील चार एकर जमीन समृध्दी महामार्गात संपादित झाली आहे. या जमिनीचा ६३ लाख रूपयांचा मावेजा परस्पर लाटण्यासाठी संशयित लालखाँ शेरखान (रा. लालबाग जालना), शेरू अफसरखाँ आणि शेख अलीम शेख करीम यांना कदीम जालना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याचे कदीम जालना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एम.एम. मिमरोट यांनी सांगितले.यासह अन्य प्रकरणांमध्येही समृद्धी महामार्गाची जमीन संपादित करताना घोटाळा झाला असल्याच्या तक्रारी आहेत.मुख्य आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागेनाया प्रकरणातील आणखी एक संशयित मुख्य आरोपी मोहंमद यासीन इंद्रीस हा अद्याप फरारी असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचा शोध घेण्यासाठी आम्ही कसून शोध घेतल्याचे सांगण्यात आले.या प्रकरणी शरीफा बेगम अब्दुल गनी (वय ८०) या नावाने तोतया महिला उभी करून अंबड येथील रजिस्ट्री कार्यालयात जीपीओ तयार करण्यात आल्याचे दिसून आले.हा जीपीओ करून पानशेंद्रा येथील चार एकर जमिनीचा ६३ लाख रूपयांचा मावेजा लाटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गArrestअटकfraudधोकेबाजी