शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्तावित मनोरुग्णालय कोंडवाडा होऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 01:11 IST

जालना येथील प्रादेशिक मनोरुग्णालय कोंडवाडा न होता सुसज्ज उपचार केंद्र व्हावे, अशी अपेक्षा मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नीरज देव यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शासनाने जालना येथे २५० खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय उभारणीस मंजुरी दिली आहे. मात्र, देशात सुरू असलेल्या मनोरुग्णालयांच्या कामकाजावर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. आपणही रुग्णालयांतर्गत पाहिलेले कामकाजाचे अनुभव वाईट आहेत. त्यामुळे जालना येथील प्रादेशिक मनोरुग्णालय कोंडवाडा न होता सुसज्ज उपचार केंद्र व्हावे. मनोरुग्णांवरील उपचारानंतर पुढील उपचारासाठी गरजेची असलेली संलग्न केंद्रे सुरू व्हावीत, अशी अपेक्षा मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नीरज देव यांनी व्यक्त केले. जालना शहरात शनिवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. देव म्हणाले, मानसिक आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहे. राज्यात सुरू असलेल्या चार मनोरुग्णालयांपैकी तीन मनोरुग्णालये पश्चिम महाराष्ट्र, कोकण भागात तर एक मनोरुग्णालय नागपूर येथे आहे. मराठवाडा व परिसरातही अनेक मनोरूग्ण आहेत. मात्र, त्यांच्यासाठी रूग्णालय नाही. विशेष म्हणजे, जालना येथे पूर्वी मनोरुग्णालय सुरू होते. मात्र, शासनाने १९५३ मध्ये ते हैदराबादला हलविले. येरवाडा रूग्णालयापेक्षा ८ वर्षे जुने हे रुग्णालय होते. मात्र, जालना येथे मनोरुग्णालय असल्याची नोंद शासकीय दप्तरी नव्हती. आपण आभ्यास करून जालना येथे मनोरुग्णालय असल्याचे समोर आणले आहे. केलेल्या अभ्यासाची माहिती आॅनलाईन प्रसिध्द करण्यात आली होती.शासन जालना येथे मनोरुग्णालय सुरू करीत असताना इतिहासातील चुकांची दुरूस्ती करण्यासाठी आपल्या बीजभूत प्रयत्नांची नोंद शासनाने घेऊन इतिहासाची दुरूस्ती करावी, अशी मागणी डॉ. देव यांनी केली. शिवाय मनोरुग्णालयांतर्गत चालणारे कामकाज आपण जवळून पाहिले आहे. त्यामुळे जालना येथे सुरू होणारे मनोरूग्णालय कोंडवाडा न होता सोयी-सुविधांनी सज्ज असे उपचार केंद्र व्हावे. मनोरुग्णांवर उपचार केल्यानंतर त्यांना थेट समाजात वावरू देता येत नाही. उपचारानंतर करावयाच्या उपचाराची केंद्रे या मनोरुग्णालयाला संलग्नित करून ती सुरू करावीत, विशेषत: बाल मनोरुग्णालयही सुरू करावे, अशी मागणीही डॉ. देव यांनी केली. मनोरुग्णालयासोबत इतर केंद्रे सुरू झाली तर त्याची मदत होऊ शकते.मोबाईल व्हॅनद्वारे जागृती करावीबुवाबाजी, धार्मिक स्थळांमधील उपचार, तांत्रिक- मांत्रिक अशा अंधश्रध्दात्मक उपचार पध्दतीवर आळा घालण्यासाठी जागृती व्हावी म्हणून शासनाने मनोरुग्णालयांतर्गत एक मोबाईल व्हॅन सेवा सुरू करावी. या मोबाईल व्हॅनद्वारे धार्मिक स्थळ परिसरात जाऊन जागृती करीत अंधश्रध्दात्मक उपचार पध्दतीला पायबंद घालावा, अशी मागणीही डॉ. डॉ. नीरज देव यांनी केली.

टॅग्स :mental hospitalमनोरूग्णालयdoctorडॉक्टरHealth Tipsहेल्थ टिप्स