शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

नानाजी देशमुख कृषी योजनेचे प्रस्ताव रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:41 IST

राज्य सरकारने नानासाहेब कृषी संजीवनी योजनेतून मृद आणि जलसंधारणाचे सूक्ष्म नियोजन करण्याचे काम रखडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य सरकारने नानासाहेब कृषी संजीवनी योजनेतून मृद आणि जलसंधारणाचे सूक्ष्म नियोजन करण्याचे काम रखडले आहे. हे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या संदर्भात नानाजी देशमुख प्रकल्प संचालकांचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून ही सूचना दिली आहे.राज्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, हिंगोली, अमरावती, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. या आत्महत्या रोखण्यासह शेतीला पुरेसे पाणी मिळावे म्हणून नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतून मृद आणि जलसंधारणाची कामे प्राधान्यने करण्याचे नियोजन आहे. यासाठी या जिल्ह्यांना विशेष बाब म्हणून निधीही मिळाला आहे. असे असताना सूक्ष्म पातळीवर जाऊन हे प्रस्ताव प्रशासनाने पूर्ण करणे अपेक्षित होते.एकूणच नानाजी देशमुख कृषी संजवनी योजनेतून जलसंधारणाला प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी कृषी, तसेच तलसंधारण विभागाने एकत्रित येऊन हे प्रस्ताव तयार करावयाचे आहेत. परंतु अशी संयुक्त कामे ही समन्वयाने होत नसल्याने ही महत्वाची योजना बारगळली आहे. या योजनेतून जी गावे पहिल्या टप्प्यात निवडली आहेत, त्यांचे डीपीआर तातडीने सादर करण्या बाबत यापूर्वीच सूचना दिल्या होत्या. परंतु दुष्काळातही याकडे प्रशासनाने गंभीरतेने घेतले नाही.परतूर, जालना पिछाडीवरनानाजी देशमुख संजीवनी योजने अंतर्गत जालना आणि परतूर तालुक्यातील प्रस्तावही अपूर्ण आहेत. त्यात जालना तालुक्यातून १३ आणि परतूर तालुक्यातून जवळपास ५४ प्रस्ताव रखडले आहेत. यासाठी अनुक्रमे २४ कोटी ४८ लाख आणि परतूर तालुक्यासाठी अंदाजे १७ कोटी रूपये मंजूर झाले असल्याचे सांगण्यात आले. हे प्रस्ताव पंधरा ते वीस दिवसात सादर करावेत असे प्रकल्प संचालकांनी त्यांच्या पत्रात नमूद केले आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प