शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

Video: बदली रद्द झाली म्हणून डीजे लावून मिरवणूक; महावितरणनने अभियंत्याला घरी बसवलं

By दिपक ढोले  | Updated: August 24, 2023 17:47 IST

रत्नागिरी येथील बदली रद्द झाल्याने कंत्राटदार आणि समर्थकांनी काढली डीजे लावून मिरवणूक

जालना : रत्नागिरी येथे झालेली बद्दली रद्द झाल्याने डीजे लावून मिरवणूक काढणे सहायक अभियंत्यास चांगलेच अंगलट आले आहे. प्रकाश चव्हाण असे त्या अभियंत्याचे नाव आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आता त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश बुधवारी रात्री काढण्यात आले आहेत. 

महावितरणच्याजालना ग्रामीण विभागात सहायक अभियंता असलेले प्रकाश चव्हाण यांची दीड महिन्यापूर्वी रत्नागिरी झोनमध्ये बदली झाली होती. मात्र, एकाच महिन्यात त्यांची रत्नागिरी येथील बदली रद्द होऊन परत जालना येथेच झोन क्र. ३ मध्ये त्याच ठिकाणी त्यांची बदली करण्यात आली. १८ ऑगस्ट रोजी बदलीचे आदेश हातात पडताच ते शहरात दाखल झाले. चव्हाण हे जालन्यात आल्याची माहिती मिळताच काही कंत्राटदार व समर्थकांनी राजूर चौफुली येथूून त्यांना खांद्यावर घेत डीजे लावून वाजतगाजत जंगी मिरवणूक काढली. मिरवणुकीने कार्यालयात आल्यानंतर सदर बाजारच्या हद्दीत भररस्त्यावर मांडव टाकून त्यांचा स्वागतसोहळाही साजरा करण्यात आला. 

डीजेला परवानगी नसल्याने आणि रस्त्यावरील मांडवामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी तातडीने ॲक्शन घेतली. या प्रकरणी पो. कॉ. मधुर राजमाने यांच्या फिर्यादीवरून सहायक अभियंता प्रकाश चव्हाण यांच्यासह २० ते ३० जणांविरुद्ध भादंवि. १४३, १८८, २८३, मपोका. १३५ कलमान्वये सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर महावितरण कंपनीनेही त्यांच्यावर कारवाई केली आहे. जालन्याचे अधीक्षक अभियंता संजय सरग यांनी बुधवारी रात्री प्रकाश चव्हाण यांचे निलंबन केल्याचे आदेश काढले आहेत.

टॅग्स :mahavitaranमहावितरणJalanaजालनाsuspensionनिलंबन