शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सीड्स पार्कच्या अडचणींचा तिढा सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 00:38 IST

बहुचर्चित सीडस् पार्कचे काम कोणत्या एजन्सीने करावे या मुद्यावरून तीन वर्षे वाया गेली आहेत. मात्र, आता राज्य सरकारने यात विशेष लक्ष घालून हे काम एमआयडीसीनेच करावे असे निश्चित केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बहुचर्चित सीडस् पार्कचे काम कोणत्या एजन्सीने करावे या मुद्यावरून तीन वर्षे वाया गेली आहेत. मात्र, आता राज्य सरकारने यात विशेष लक्ष घालून हे काम एमआयडीसीनेच करावे असे निश्चित केले आहे. सिडस् पार्कचा आराखडा तयार करण्यासाठी एका खाजगी एजंसीची मदत घेणार असल्याचे सांगण्यात आले.जालना ही बियाणांची राजधानी असून, याला आणखी चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१६ मध्येच जालन्यात शीतल सीडस्च्या कार्यक्रमात जाहीर केले होते. यासाठी कॅबिनेटने ११० कोटी रूपये मंजूरही केले आहेत. परंतु निधी उपलब्ध असतानाही केवळ शासनाच्या वेळकाढू धोरणामुळे हा प्रकल्प कागदावरच राहीला. परंतु आता या प्रकल्पाने गती घेतली असून, जिल्हधिकारी रवींद्र बिनवडे यांनी यात पुढाकार घेतला असून, याठी समन्वयक म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर यांची नियुक्ती केली आहे.या सीडस् पार्कमध्ये अंदाजित तीन हजार कोटी रूपयांची गुंतणवूक अपेक्षित असून, त्यासाठी शंभर एकर जमीन ही जालना ते देऊळगावराजा मार्गवर संपादित केली आहे. या उपक्रमातून जालन्यात संशोधन केंद्र स्थापन करण्यात येणार असून, यातून शेतकऱ्यांचे माती परीक्षण तसेच बियाणांची गुणवत्ता त्तपासता येणार आहे. आता पर्यंत या बीजोत्पादन क्षेत्रात जवळपास २० हजार शेतकरी सहभागी असून, त्यांची वार्षिक उलाढाल ही २५० कोटी रूपयांच्या घरात आहे.जालना जिल्ह्यातील पोषक वातावरण ही या प्रकल्पाची जमेची बाजू असून, त्याच मूळे येथे पूर्वीही बियाणे उद्योगाचा विकास झाला आहे. त्याच धर्तीवर हा सीडस् पार्क उभा राहिल्यास त्यातून जवळपास ४० हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळू शकेल असेही सांगण्यात आले. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आणखी किमान एक वर्षाचा कालावधी लागू शकतो. गुजरात आणि तेलंगणामध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रGovernmentसरकार