शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बदनापूरजवळ खाजगी बस उलटून भीषण अपघात; १२ प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 09:01 IST

पुण्याहून रिसोडकडे जात असलेली खाजगी बस बदनापूर शहराजवळ आज पहाटे पाच वाजता जालनारोडवर उलटली.

बदनापूर ( जालना): शहरा जवळ आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास एक खाजगी बस उलटून त्यांनतर बसवर एक ट्रक आदळून भीषण अपघात झाला. यात बसमधील दहा ते बारा प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती आहे.

याबाबत माहिती अशी, बालाजी ट्रॅव्हल्सची पुण्याहून रिसोडकडे जात असलेली खाजगी बस बदनापूर शहराजवळ जालना रोडवर अचानक उलटली. त्यानंतर औरंगाबादहून जालनाकडे जाणारा एक ट्रक सुद्धा या बसवर आढळला. या भीषण अपघातात बसमधील दहा ते बारा प्रवासी जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमी प्रवाशांना जालना येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

दरम्यान, अपघातामुळे जालना औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक दोन ते अडीच तास विस्कळीत झाली होती. महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.  पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस उपनिरीक्षक बी टी सहाणे पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन जारवाल गोपाल बारवाल, विशाल काळे, ज्योती खरात, आरती रणदिवे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त बस बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्यात आली.

ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात झाला अपघात? पहाटे पाऊस सुरू होता. दरम्यान, भरधाव वेगात एका ट्रकला ओव्हरटेक केल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने खाजगी बस उलटली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघातानंतर या महामार्गावर दुभाजकावर लावलेले लोखंडी बॅरिकेट्स तुटले होते.

टॅग्स :AccidentअपघातJalanaजालना