शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खतांची दरवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:53 IST

यंदाच्या हंगामात ५० किलोच्या प्रति बॅगला १०० ते २०० रुपयांची वाढ केल्याने शेतकऱ्यांना चांगलाच शॉक दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दुष्काळामुळे आधीच शेतकरी आर्थिक संकटात आहेत. अशा परिस्थितीत हंगामापूर्वीच खत उत्पादन कंपन्यांनी दरवाढ केली आहे. परिणामी, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यंदाच्या हंगामात ५० किलोच्या प्रति बॅगला १०० ते २०० रुपयांची वाढ केल्याने शेतकऱ्यांना चांगलाच शॉक दिला आहे.जिल्ह्यात सलग चार वर्षापासून दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकरी हैराण आहेत. यामुळे शेतीच्या व्यवसाय आर्थिक आतबट्ट्यात ठरत आहे. यंदा कमी पर्जन्यमानामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप तसेच रबी हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेल्याने शेतीत लावलेला खर्चही हाती पडलेला नाही. यामुळे शेतक-याचा वर्षभराचा हिशोब बिघडला आहे. अशा अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना खत उत्पादक कंपन्यांनी हंगामापूर्वीच दरवाढ करुन चांगलाच धक्का दिला आहे. गतवर्षी सरकारने अनुदानात कपात केल्यानंतर खत उत्पादक कंपन्यांनी दर वाढविले आहेत. सदरील दरवाढ शेतक-यांच्या खिशाला न परवडणारी आहे.५० किलो वजनाच्या प्रति बॅगमागे १०० ते २०० रुपयांपर्यत वाढ करण्यात आल्याने शेतक-यांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे.गतवर्षी शेतक-यांना या खताची बॅग केवळ ९९७ रुपयांत मिळत असे आता या खताच्या बॅगसाठी १ हजार १०० रुपये द्यावे लागणार आहेत. म्हणजेच एका बॅगमागे १०३ रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे.दुष्काळ आणि नापिकीसारख्या संकाटामध्ये पिचलेल शेतक-यांना खताच्या दरमध्ये वाढ केल्याने शेतक-यात संताप आहे.याकडे जिल्हाधिका-यांनी लक्ष देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.डीएपी खताच्या एकाबॅगेसाठी पूर्वी १ हजार २८० रुपये मोजावे लागत होेते. आता शेतकºयांना डीएपी च्या एका बॅगेसाठी १ हजार ४७७ रुपये वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच पूर्वीच्या तुलनेत शेतक-यांच्या खिशाला १९७ रुपयांची जास्तीची झळ बसणार आहे.४१०: २६ : २६ या खताची बॅग गतवर्षी शेतक-यांना १ हजार १८३ रुपयांना मिळत असे आता १ हजार ४०० रुपये मोजावे लागणार आहेत.४म्हणजेच एक बॅगमागे २१७ रुपयांची वाढ झाली. असेच चित्र २०:२०:१३ या खताच्या दराबाबत आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीEconomyअर्थव्यवस्था