शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत उडी मारलेल्या प्रेमयुगुला पोलिसांनी काढले बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 23:13 IST

तालुक्यातील सामनाव शिवारातील गट क्रमांक ३३९ मधील एका विहिरीत शनिवारी सायंकाळी आठच्या सुमारास एका प्रेमी युगुलाने उडी घेतली.

जालना :

तालुक्यातील सामनाव शिवारातील गट क्रमांक ३३९ मधील एका विहिरीत शनिवारी सायंकाळी आठच्या सुमारास एका प्रेमी युगुलाने उडी घेतली. विहिरीत पाणी कमी असल्याने दोघेही पाईपला धरून बसले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांसह तालुका पोलिसांनी दोघांना विहिरीतून बाहेर काढून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती तालुका पोलीस ठाण्याची सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी वडते यांनी दिली.शहरातील रेल्वेस्थानक परिसरातून दोन बहिणी शुक्रवारपासून बेपत्ता आहेत. यातील एकजण अल्पवयीन आहे. या प्रकरणी त्यांच्या नातेवाइकांनी कदीम ठाण्यात मुली बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, तपास सुरू असताना सदर मुली सामनगाव शिवारात असल्याची माहिती कदीम पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे मुलींचे  नातेवाईक व पोलीस सामनगाव शिवारातील एका शेतात पोहचले. तेथील एका व्यक्तीसह शेतात दोन्ही मुली  होत्या. मुलींचे नातेवाईक परिचित असल्याने तो घाबरला. त्यानंतर त्या व्यक्तीसह मोठ्या मुलीने शेतातील एका विहिरीत उडी घेतली.मात्र, विहिरीत पाणी कमी असल्याने दोघेही पाईपला धरून बसले. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी शेताकडे धाव घेतली. तालुका ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी दोरी विहिरीत सोडून दोघांना पाण्यातून बाहेर काढले. दोघांना किरकोळ मार लागला असून, त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केल्याचे सहायक निरीक्षक वडते यांनी सांगितले. या प्रकरणी तालुका ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कुठलीही नोंद नव्हती.