शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीतून दानवेंचे शक्तिप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:57 IST

जालन्यात सोमवारी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक होऊ घातली आहे. ही बैठक जालन्यात आयोजित करून एक प्रकारे भाजपचे प्रदेशाध्क्ष खा. राववसाहेब दानवेंचे यांचे शक्तिप्रदर्शनच असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालन्यात सोमवारी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक होऊ घातली आहे. ही बैठक जालन्यात आयोजित करून एक प्रकारे भाजपचे प्रदेशाध्क्ष खा. राववसाहेब दानवेंचे यांचे शक्तिप्रदर्शनच असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ही बैठक जालन्यात घेऊन आपल्या प्रचाराचाही एक प्रकारे श्रीगणेशा दानवे हे करत असल्याचे वास्तव आहे.जालना लोकसभा मतदार संघात सलग चार वेळेस निवडून येण्याची किमया साधणारे खा. दानवे यांच्यासाठी यंदाची ही निवडणुक प्रतिष्ठेची ठरणार आहे. त्यांची टक्कर यावेळी शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याशी होण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन दानवेंनी आपले फासे फेकले आहेत. सोमवारी होणाऱ्या या बैठकीस भाजपचे सर्व मंत्री तसेच वरिष्ठ प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी येणार आहेत. या बैठकीत एकूण १२ प्रमुख विषयांवर चर्चा होणार आहे. त्यात प्रामुख्याने लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत कोणती रणनिती आखावी यावर मंथन येणार असल्याचे एका पदाधिका-याने सांगितले. दरम्यान लोकसभा निवडणुकीपूर्वी होणारी प्रदेश कार्यकारिणीची ही शेवटची बैठक राहणार असल्याने पक्षपातळीवरील संघटन आणखी मजबूत करण्यावरही चर्चा करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.या बैठकीस राज्यातील जवळपास ६०० पेक्षा अधिक पदाधिकारी हजर राहणार असून, रविवारी रात्रीच बहुतांश मंत्री जालन्यात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील रात्री जालन्यात मुक्कामास येणार असा निरोप होता, त्यामुळे शासकीय विश्रामगृहाला छावणीचे स्वरूप आले आहे. मंत्री मंडळाच्या गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीस अनुपस्थित राहिलेल्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे तसेच भाजपावर नाराज असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे हे या बैठकीला हजेरी लावतात काय याबद्दलही तर्क-वितर्क लावले जात आहेत.बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार असल्याने ते जालन्यासाठी कोणती घोषणा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :BJPभाजपाraosaheb danveरावसाहेब दानवे