शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

१८६ शिक्षकांची पदे भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:34 IST

शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली असून, पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १८६ जागा भरण्यात येणार असून, याबाबतची माहिती राज्य शासनाने मागितली असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली असून, पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १८६ जागा भरण्यात येणार असून, याबाबतची माहिती राज्य शासनाने मागितली असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली.गत अनेक वर्षांपासून राज्यात शिक्षक भरती करण्याची मागणी करण्यात येत होती. यासाठी विविध शिक्षक संघटनांनी आदोंलने, उपोषणे करुन शिक्षक भरतीच्या मागणीचा जोर धरला होता. त्या अनुषगांने राज्य सरकारने शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरु केली असून, पहिल्या टप्प्यात १०,००१ जागा भरण्यासंदर्भात पवित्र वेब पोर्टलवर जाहिरात प्रसिध्द केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १८६ शिक्षकांच्या जागा भरण्यात येणार आहे. यात मराठी माध्यमाच्या १६६ तर उर्दु माध्यमाच्या २० जागा भरण्यात येणार असून, याबाबतची माहिती राज्य शासनाने शिक्षण विभागाला मागविली आहे. त्यानुसार माहिती गोळा करण्याचे काम सुरु असून, ही माहिती लवकरच राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले.निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यामध्ये ३२५ पदे रिक्त आहेत. यापैकी १८६ शिक्षकांची पदे भरतीतून भरली जाणार आहे. शिक्षक भरतीमध्ये पात्र शिक्षकांना संधी मिळणार आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकEducation Sectorशिक्षण क्षेत्र