शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित; तूर्तास स्थगितिची लक्ष्मण हाकेंची घोषणा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 05:38 IST

आंदोलन थांबलेलं नाही : लक्ष्मण हाके विधिमंडळांतही आरक्षण हवे : भुजबळ

पवन कुमार

वडीगोद्री (जि. जालना) : ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, बोगस प्रमाणपत्र देणाऱ्यांवर कारवाई करू, असे लेखी आश्वासन शासनाने दिल्यानंतर वडीगोद्री (ता. अंबड) येथे सुरू असलेले ओबीसी आरक्षण बचाव आमरण उपोषणकर्ते प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी शनिवारी तात्पुरते स्थगित केले. तूर्तास उपोषण स्थगित केले आहे. परंतु, आंदोलन थांबलेले नाही, असे लक्ष्मण हाके म्हणाले, तर जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका करताना, छगन भुजबळ यांनी ओबीसींना विधानसभा, लोकसभेतही आरक्षण हवे, अशी मागणी केली. 

मंत्रिमंडळाच्या बैठकीत इतर मागास प्रवर्गातील मागण्यांबाबत चर्चा झाली. काही मागण्यांवर निर्णय घेण्यात आले, काही बाकी आहेत. ज्या मागण्या बाकी आहेत, त्या पूर्ण करण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत, असे सरकारने म्हटले आहे.

आम्हाला विधानसभेत आणि लोकसभेतही आरक्षण हवे : भुजबळ- आम्ही जातिवाद केला नाही. त्याला एवढे माहिती नाही की विधानसभेत, लोकसभेत आम्हाला आरक्षण नाही. आता आम्हाला विधानसभेत आणि लोकसभेतही आरक्षण हवं आहे.- आमचं आरक्षण आमच्या ताटात राहू द्या, त्यांना दुसरं आरक्षण द्या. आम्ही त्यांना पाठिंबा देतो. ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही. आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, असे छगन भुजबळ म्हणाले.

आरक्षणाचे संरक्षण सरकार करणार : मुंडे - आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपोषणाच्या मागण्या शुक्रवारच्या बैठकीत मांडल्या. जे जे विषय त्या बैठकीत मांडले ते शासनाने गांभीर्याने घेतले आहेत.- नऊ महिन्यांपासून महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या मनामध्ये शासनाने एका विशिष्ट आंदोलनाबाबत घेतलेल्या निर्णयाचा परिपाक या वडीगोद्रीत झाला आहे. ओबीसी आरक्षणाचे संरक्षण सरकार करणार आहे, असे आश्वासन मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी दिले.

टॅग्स :laxman hakeलक्ष्मण हाकेOBC Reservationओबीसी आरक्षणChhagan Bhujbalछगन भुजबळDhananjay Mundeधनंजय मुंडे