तालुक्यातील पळसखेड मूर्तड ग्रामपंचायत निवडणूक भाजपच्या दोन गटांत अत्यंत चुरशीची झाली. यात माजी सरपंच भगवान पाटील सोनुने यांच्या पॅनलच्या सहा उमेदवारांनी बाजी मारली होती.
त्यामध्ये कस्तूरबाई सोनुने, बशीर शहा, अरुण सोनुने, तुकाराम वरपे, दुर्गाबाई वरपे, वेणूबाई काळे हे सदस्य निवडून आले होते. सरपंच व उपसरपंच यांची निवड बिनविरोध करण्यात आली. यावेळी सरपंच कस्तूरबाई सानुने यांनी गावाच्या विकासाठी अहोरात्र काम करून गावाचा चेहरा- मोहरा बदलण्यासाठी, गावच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे सांगितले. यावेळी प्रभाकर सोनुने, वामन सोनुने, विलास साबळे, रामेश्वर सोनुने, भीमराव सोनुने, लक्ष्मण सखाराम, गोविंदा महाराज, तेजराव काळे, रसूल शेख, मोईन शहा, पुरुषोत्तम सोनुने, लतीफ शेख, मनोहर साबळे, अहिमद शहा, रघुनाथ वरपे, साहेबराव फकिरबा, विनायक सोनुने व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
फोटो