शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

गावा-गावात वाचनालय सुरू करण्याचा पोलिसांचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 00:26 IST

पोलीस आपले मित्र बनण्यासाठी आतूर आहेत. आपणही पोलिसांना साथ द्यावी. पोलीस दल व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने भविष्यात गावागावात वाचनालय सुरू करण्याचा संकल्प असून, पाणीदार गावाचे स्वप्न आज पूर्णत्वास आल्याचा आनंद होत असल्याचे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल यांनी केले.

ठळक मुद्देरवींद्र सिंघल : कासारवाडीत श्रमदान; शैक्षणिक साहित्याचे वाटप, पोलिसांच्या श्रमदानामुळे हरकले ग्रामस्थ, चांगल्या पावसाची प्रतिक्षा

अंबड : पोलीस आपले मित्र बनण्यासाठी आतूर आहेत. आपणही पोलिसांना साथ द्यावी. पोलीस दल व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने भविष्यात गावागावात वाचनालय सुरू करण्याचा संकल्प असून, पाणीदार गावाचे स्वप्न आज पूर्णत्वास आल्याचा आनंद होत असल्याचे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल यांनी केले.दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रवींद्र सिंघल यांच्या प्रेरणेतून पोलीस दलाच्या वतीने अंबड तालुक्यातील कासारवाडी हे गाव पाणीदार करण्यासाठी दत्तक घेण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सी. डी. शेवगण, अंबड पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कासारवाडी येथील नदीपात्रात श्रमदानातून खोलीकरण- रूंदीकरण करून त्यावर मातीचा बंधारा बांधला आहे. या कामात ग्रामस्थांसह सामाजिक काम करणाºया संस्थांची पोलिसांना मदत मिळाली.जलचळवळीचे जनक विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल यांनी कासारवाडी येथे शुक्रवारी श्रमदान केले. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, उपविभागीय पोलिस अधिकारी सी.डी. शेवगण, पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. सिंघल यांनी कामाची पाहणी करून जल संवर्धनाबद्दल ग्रामस्थांशी संवाद साधला. दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांना सिंघल यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी बोलताना सिंघल म्हणाले, सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन कोणतेही कार्य केले तर त्याला नक्कीच यश मिळते. माझ्यासारखा एका सामान्य कुटुंबातील मुलगा आज या पदापर्यंत केवळ सकारात्मक दृष्टिकोनामुळेच पोहोचू शकत असेल तर इथे उपस्थित असणाºया प्रत्येकाला कोणत्याही क्षेत्रात यश मिळवणे नक्कीच शक्य असल्याचेही ते म्हणाले. या कार्यपूर्तीचा आनंद व पोलिसांप्रतीची कृतज्ञता यावेळी ग्रामस्थांच्या चेहºयावर दिसत होती. यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :JalanaजालनाPoliceपोलिसSocialसामाजिक