शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शेळ्या संभाळताना पोलिसांची दमछाक! चोरीच्या संशयावरून ३४ शेळ्या घेतल्या होत्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 21:02 IST

भोकरदन पोलिसानी चोरीच्या संशयावरून सिरसगाव मंडप येथून ३४ शेळ्या ताब्यात घेतल्या होत्या. मात्र, या शेळ्यांचा मालकी हक्क सांगण्यास अद्याप  कुणीच पुढे आलेला नाही.

भोकरदन (जि.जालना) : भोकरदन पोलिसानी चोरीच्या संशयावरून सिरसगाव मंडप येथून ३४ शेळ्या ताब्यात घेतल्या होत्या. मात्र, या शेळ्यांचा मालकी हक्क सांगण्यास अद्याप  कुणीच पुढे आलेला नाही. त्यामुळे गत चोवीस तासांपासून ३४ शेळ्या सांभाळताना पोलिसांची तारांबळ उडाली आहे. चोरीच्या शेळ्या असल्याच्या संशयावरून भोकरदन पोलिसांनी बुधवारी सिरसगाव मंडप येथील शेख अन्सार यांच्या घरासमोरून ३४ शेळ्या ताब्यात घेतल्या होत्या. याबाबत शेख अन्सार यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी या शेळ्यांबाबत काहीच माहिती नसल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी गावचे पोलीस पाटील व कोतवाल यांना या शेळ्या संभाळण्याच्या सूचना केल्या. मात्र, त्यांनी आम्ही शेळ्या संभाळणार नाही, असे सांगितले. नाईलाजास्तव पोलिसानी या शेळ्या एका टेंम्पोमध्ये भोकरदन येथील गोशाळेत आणल्या. यातील एका शेळीने बुधवारी रात्री एका पिलाला जन्म दिला. शेळ्यांसह गोशाळेतील जनावरांचा सांभाळ करणे येथील कर्मचा-यांना अवघड झाले. शेळ्या व अन्य जनावरांचे एकाच ठिकाणी वास्तव्य असल्यामुळे गोशाळेतल जनावरांना रोगाची लागण होऊ शकते, असे सांगत गो- शाळेच्या संचालकांनी गुुरुवारी सकाळी पोलिसांना सर्व शेळ्या घेऊन जाण्यास सांगितले. त्यामुळे  पोलिसांनी गो शाळेतून शेळ्या काढून घेतल्या. आता या शेळ्यांना ठेवायचे कोठे हा प्रश्न भोकरदन पोलिसांना पडला आहे. गुरुवारी बुलडाणा व लोणार येथील काही नागरिक चोरीस गेलेल्या शेळ्या सापडल्याच्या माहितीवरून भोकरदन पोलीस ठाण्यात आले. मात्र, भोकरदन पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शेळ्या आपल्या नसल्याचे या नागरिकांनी सांगितले. त्यामुळे अगोदरच  संख्याबळ  कमी असलेल्या पोलिसांसमोर आता या शेळ्यांचा सांभाळ करायचा कुणी अशा प्रश्न आहे. सध्या भोकरदन-सिल्लोड रोडवरील एका खाजगी व्यक्तीच्या शेडमध्ये या शेळ्या ठेवण्यात आल्या आहेत. भोकरदन पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ३४ शेळ्यांवर अद्याप कुणीही हक्क  सांगितलेला नाही. या शेळ्या चोरीच्या असल्याचा संशय आहे. आम्ही त्या दृष्टीने तपास करत आहोत. सध्या तरी शेळ्या सांभाळण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे.- दशरथ चौधरी, पोलीस निरीक्षक, भोकरदन ठाणे. 

टॅग्स :Policeपोलिस