शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेताना पोलीस जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 00:34 IST

दीम पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उप निरीक्षकाने गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदारांकडून ५ लाखांच्या लाचेची मागणी केली. यातील अ‍ॅडव्हान्स म्हणून १० हजार रुपये देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहायक पोलीस उपनिरीक्षकास ताब्यात घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील कदीम पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उप निरीक्षकाने गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदारांकडून ५ लाखांच्या लाचेची मागणी केली. यातील अ‍ॅडव्हान्स म्हणून १० हजार रुपये देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहायक पोलीस उपनिरीक्षकास ताब्यात घेतले.भागूजी बजाजी पांढरे (५४, रा. पोलीस वसाहत जालना) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तक्रारदारच्या मुलाविरुध्द एका महिलेने अत्याचार केल्याची तक्रार दिली होती. या प्रकरणात ज्यांच्या मुला विरूध्द ही तक्रार दाखल होती, त्यांना पांढरे याने मोबाईल करून पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. तसेच जर तुमच्या मुलाची नोकरी वाचवायची असेल तर, पाच लाख रूपये द्यावेत अशी मागणी केली. संबंधितांनी आम्हाला मुलाविरूध्द काय अर्ज केला आहे, हे दाखवावे अशी विनंती केली, मात्र ती विनंती पांढरे यांनी धुडकावून लावली.पाच लाख रूपये न दिल्यास मुलाविरूध्द ३७६ कलमानुसार गुन्हा दाखल करणार असल्याचे धमकावले. हा गुन्हा दाखल झाल्यावर मुलाला अटक होऊन कारागृहाची हवा खावी लागेल.यामुळे मुलाची नोकरी देखील धोक्यात येईल असे सांगून दहा हजार रूपये अ‍ॅडव्हान्स द्यावेत असे ठरले. त्यानुसार तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने जालन्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला. त्यानुसार कदीम जालना पोलीस ठाणा परिसरात लाच देण्याचे ठरले.यावेळी पांढरे याला दहा हजार रूपये तक्रारदाराकडून स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्यांना लगेच अटक करण्यात आली. या प्रकरणी रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक डॉ. परोपकारी, पोलीस उपाधिक्षक निकाळजे, पोलीस निरीक्षक आदिनाथ काशिद यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी यशस्वी केली.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागArrestअटकPoliceपोलिस