शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

चोरीतील कारसह सव्वा लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 00:25 IST

चोरी, घरफोड्यातील हद्दपार आरोपीसह चार जणांना एडीएसच्या पथकाने जेरबंद केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : चोरी, घरफोड्यातील हद्दपार आरोपीसह चार जणांना एडीएसच्या पथकाने जेरबंद केले. ही कारवाई सोमवारी सकाळी जालना शहरातील पॅलेस हॉटेलच्या मागे करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीच्या कारसह १ लाख २२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.जालना शहरासह परिसरातील घरफोड्या, चोऱ्यांमधील आरोपी शहरातील पॅलेस हॉटेलच्या मागे आल्याची माहिती एडीएसचे प्रमुख पोनि यशवंत जाधव यांना मिळाली होती. या माहितीवरून पोनि जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारी सकाळी कारवाई करून गजानन सोपान सिगाडे (रा. पांचनवडगाव ता.जालना), हद्दपार असलेला हरदीपसिंग बबलूसिंग टाक (रा.गुरूगोविंदसिंग नगर, जालना), दियासिंग बरिहामसिंग कलानी (रा. हिन्दनगर जालना) या तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्या तिघांकडे चौकशी केल्यानंतर तीन चोरीच्या गुन्ह्याची कबली दिली. तसेच त्यांच्याकडून देऊळगाव राजा येथून चोरलेली विना नंबरची एक कार, कटर, टामी, हातोडी व इतर असा एकूण १ लाख २२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर ललूसिंग जिलेसिंग कलानी (रा. जालना) याला त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले.ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एडीएसचे प्रमुख पोनि यशवंत जाधव, सपोउपनि एम.बी.स्कॉट, पोहेकॉ रामप्रसाद रंगे, सुभाष पवार, नंदकिशोर कामे, पोकॉ संदीप चिंचोले, राजू पवार, आकाश कुरील, विजय निकाळजे, श्रीकुमार आडपे यांच्या पथकाने केली. संबंधितांकडून चोरीच्या इतर घटनांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.एडीएसच्या पथकाने जेरबंद केलेला आरोपी हरदिपसिंग बबलूसिंग टाक हा दोन वर्षासाठी जालना, औरंगाबाद व बुलडाणा या जिल्ह्यातून हद्दपार आहे. शिवाय त्याच्याविरूध्द विविध चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :Jalna Policeजालना पोलीसArrestअटकThiefचोर