शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पासोडी शिवारात गांजाच्या शेतीवर पोलिसांनी टाकली धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 00:54 IST

पासोडी गावाच्या शिवारातील गांजाच्या शेतीवर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने गुरूवारी दुपारी धाड मारून दोन क्विंटल गांजाची झाडे जप्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन/ जाफराबाद : जाफ्राबाद तालुक्यातील पासोडी गावाच्या शिवारातील गांजाच्या शेतीवर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने गुरूवारी दुपारी धाड मारून दोन क्विंटल गांजाची झाडे जप्त केली. पोलिसांनी एकूण २० लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़पासोडी शिवारातील शेतामध्ये गांजाची झाडे लावली असल्याची माहिती भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांना मिळाली होती. त्यानंतर जयभाये यांनी सदर झाडे हे गांजाचीच आहेत का, याची कृषी अधिकाºयाकडून खात्री करून घेतली. त्यानंतर पोलीस अधीक्षक एस़ चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली १७ आॅक्टोबर रोजी पासोडी येथील (अंखडबेल वस्ती) गट क्रंमाक ६७ मध्ये गांजाची लागवड केलेल्या शेतावर जायभाये यांनी स्वत: धाड मारली.त्यावेळी या ठिकाणी कपाशीच्या शेतात, बांधावर, दुसºया शेताच्या बांधाने गांजाची १७८ तब्बल झाडे लागवड केलेली आढळून आली. ही सर्व झाडे उपटून त्याचे वजन केले असता १ क्विंटल ९७ किलो वजन भरले असून, त्याची किंमत १९ लाख ७० हजार रूपये एवढी झाली. पोलिसांनी शेतमालक भालचंद्र हरचंद काकरवाल (रा. पासोडी ता. जाफराबाद) याला अटक केली. आणखी काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे़या प्रकरणात हसनाबाद पोलीस ठाण्यात रात्री उशिरा एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. यातील काही आरोपी फरार झाले असल्याचे कळते. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये, जाफराबादचे सपोनि अभिजित मोरे, सपोनि ज्ञानेश्वर पायघन, पोलीस कर्मचारी रामेश्वर शिनकर, गणेश पायघन, सागर देवकर, जगदीश बावणे, नीलेश फुसे, गणपत बनसोडे, राजू डोईफोडे, नरहरी खार्डे, आधार भिसे, ईश्वर देशपांडे, उमेश टेकाळे शाबान तडवी, गजानन भुतेकर, म्हस्के-पाटील, कृषी विभागाचे सिताफळे, मंडळाधिकारी शिदे यांनी आदींनी केली.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही मोठी कारवाई केल्याने भोकरदन, जाफराबाद तालुक्यात खळबळ उडाली आहे. गत काही महिन्यांपूर्वी टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुनील जायभाये यांनी अफूच्या शेतीवर छापा मारला होता़दरम्यान, ज्या शेतात गांजाची लागवड केली होती. तो भाग विदर्भाला लागून आहे. त्यामुळे तिकडे सहसा कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे याच संधीचा फायदा घेऊन काकरवाल यांनी गांजाची लागवड केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.डीवायएसपींसह कर्मचारी दुचाकीवर घटनास्थळीपासोडी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर भालचंद्र कांकरवाल यांनी डोंगराळ भागातील शेतामध्ये गांजाची झाडे लावली होती. कारण त्या भागात कधीही कोणी फिरकत नाही त्यामुळे ते सुध्दा बिनधास्त होते.यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनीही शक्कल लढवली.१७ आॅक्टोबर रोजी चार ते पाच वाजेच्या दरम्यान पोलिसाचा ताफा पासोडी गावापर्यन्त गेला मात्र त्या शेताकडेगाडी जात नव्हती त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांनी व त्याच्या सोबतच्या अधिकारी व कर्मचा-यानी दुचाकीवर शेतापर्यन्त गेले व दुचाकी जात नाही अशा ठिकाणी पायी जाऊन ही मोठी कारवाई यशस्वी केली आहे़

टॅग्स :Drugsअमली पदार्थCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस