जालना : जिल्ह्यात २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे. गणेशोत्सवानिमित्त सर्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापणा करण्यासाठी पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी जिल्हा पोलिस दलाच्या वतीने ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. परंतु, अनेक जण अनधिकृतरित्या श्रींच्या मूर्तींची प्रतिष्ठापणा करताना दिसतात. अशा मंडळांमुळे गणेशोत्सवातील व मिरवणूक काळातील कायदा- सुव्यवस्थेचे नियोजन करताना पेालिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर ताण येतो. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांनी परवानगी घेवूनच श्रींची प्रतिष्ठापणा करावी, असे आवाहन जिल्हा पोलिस दलाच्या वतीने करण्यात आले आहे. तांत्रिक समस्या आल्यास संबंधित पोलिस ठाण्याशी संपर्क साध्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
कसा कराल अर्जसार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी https://citizen.mahapolice.gov.in/Citizen/Login.aspx ही लिंक ओपन करावी. त्यानंतर लॉगीन आयडी व पासवर्ड क्रिएट करावा. ही प्रक्रिया झाल्यानंतर लॉगीन आयडी, पासवर्ड टाकून लॉगीन करावे. लॉगीन झाल्यानंतर सिटीझन सर्व्हिसेसमध्ये गणेश फेस्टिव्हल परमिशन ॲप्लिकेशनवर क्लिक करून संपूर्ण माहिती भरावी.
अर्ज करताना ही माहिती सोबत ठेवाऑनलाइन अर्ज करताना मंडळाचे नाव, संपूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक, मंडप् उभारण्याचे ठिकाण, तारीख व वेळ, मिरवणुकीचा मार्ग, वेळ आणि आयोजन तपशील, ध्वनीवर्धक प्रणाली वापराची माहिती, उत्तरदायीत्व व्यक्तीचे नाव, ओळखपत्र व संपर्क क्रमांक, कायद्याचे पालन करणारे घोषणापत्र, आपत्कालीन व्यवस्थापनाची आखणी ही माहिती असणे गरजेचे आहे.
तर कायदेशीर कारवाईपनवानगीशिवाय मंडप, ध्वनीवर्धकाचा वापर करणे, मिरवणूक काढण्यास मनाई आहे. अशाप्रकारे कृत्य करणाऱ्या मंडळांवर कायदेशीर कारवाई जाणार आहे.
सार्वजनिक गणेश मंडळांनी पोलिस दलाच्या वेबसाईटवर ऑनलाइन नोंदणी करावी. गणेशोत्सव शांततेत साजरा करावा. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई केली जाईल.- अजयकुमार बन्सल, पोलिस अधीक्षक