शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

कत्तलीसाठी जाणाऱ्या चोवीस जनावरांना पोलिसांनी दिले जीवदान

By दिपक ढोले  | Updated: March 18, 2023 16:23 IST

ही जनावरे कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात असताना ग्रामस्थांनी भेंडाळा फाटा येथे दोन्ही वाहने पकडली.

जालना : दोन आयशर ट्रकमध्ये कोंबून कत्तलीसाठी जाणाऱ्या २४ जनावरांची घनसावंगी पोलिसांनी सुटका केली आहे. ही कारवाई घनसावंगी तालुक्यातील भेंडाळा फाट्याजवळ करण्यात आली. पोलिसांनी दोन आयशरसह २४ जनावरे असा एकूण २० लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शुक्रवारी रात्री  चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुंभार पिंपळगाव येथील आठवडी बाजारातून २४ जनावरे खरेदी करून बेकायदेशीररीत्या दोन ट्रकमध्ये कोंबून वाहतूक केली जात होती. एका ट्रकमध्ये १४ तर दुसऱ्या ट्रकमध्ये १० जनावरे दाटीवाटीने निर्दयीपणे उभा करण्यात आली होती. ही जनावरे कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात असताना ग्रामस्थांनी भेंडाळा फाटा येथे दोन्ही वाहने पकडली. याची माहिती घनसावंगी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही ट्रकमधून जवळपास २४ जनावरांची सुटका केली. दोन्ही ट्रक जमा करून पोलिसांनी घनसावंगी पोलिस ठाण्यात उभा केले आहेत. याप्रकरणी राहुल कालिदास वरतले यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित निर्दोक्ष सुखदेव गरड, मोसीम कुरेशी (दोघे रा. आष्टी) यांच्या विरोधात घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर सुरेश गणेश सैबेवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित उद्धव आश्रुबा भुतेकर व व्यापारी वसीम (दोघे रा. परतूर) यांच्याविरुद्ध घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष मरळ करीत आहेत.

टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारी