जालना : वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांच्या वतीने बुधवारी रात्री शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. १० पोलीस अधिकारी व ७० कर्मचाऱ्यांचा यात सहभाग होता. यात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून जालना शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांच्या आदेशावरून उपविभागीय अधिकारी सुधीर खिरडकर यांनी बुधवारी रात्री शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबविले. यात पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेणे, हिस्ट्रीसीटरची तपासणी, रेकॉर्डवरील आरोपींचा शोध, नाकाबंदी तसेच गुन्हेगारी वस्तींची झाडाझडती घेण्यात आली. या कोम्बिंग ऑपरेशनसाठी १० अधिकारी व ७० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यात २४ हिस्ट्रीसीटर पैकी १० आरोपी मिळून आले नाही. तर फरार असलेले १९ पैकी ४ आरोपी मिळून आले आहेत. रेकॉर्डवरील ११ पैकी ४ आरोपी मिळून आले. शिकलकरी मोहल्ल्याची झाडाझडती घेण्यात आली. या ऑपरेशनदरम्यान, मंदिर, मस्जीद, रेल्वेस्थानक पेट्रोल पंपांची तपासणी करण्यात आली. नाकाबंदीअंतर्गत ३४ वाहनांची तपासणी करण्यात आली. हे ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोनि. यशवंत जाधव, पोनि. महाजन, पोनि. कौठाळे, पोनि. बागूल यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वी केले.
===Photopath===
250221\25jan_38_25022021_15.jpg~250221\25jan_39_25022021_15.jpg
===Caption===
वाहनांची तपासणी करताना पोलीस दिसतआहे. ~तपासणी करताना पोलीस