लोकमत न्यूज नेटवर्कचंदनझिरा : येथील चंदनझिरा पोलिसांनी केलेल्या कारवाईत दुचाकी चोरास पकडून त्यांच्याकडून ९ दुचाकी जप्त केल्या आहे. विनोदसिंग सत्तलाल राणा (रा. देहेडकरवाडी) असे दुचाकी चोराचे नाव आहे. ही कारवाई बुधवारी करण्यात आली.जालना तालुक्यातील काळेगाव येथील अशोक लक्ष्मण भालेराव हे दि.२१ जुलै रोजी नवीन मोढा येथे भाजी आण्यासाठी आले असता त्यांनी त्यांची दुचाकी (क्र. एमएच.२१. एडब्लू.२०३६) ही येथील एका दुकानासमोर उभी केली होती. परंतु भाजी आणल्यानंतर ते येथे आले असता, त्यांना दुचाकी दिसली नाही. त्यानंतर त्यांनी याविषयी चंदनझिरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुध्द तक्रार दाखल केली. या गुन्ह्यांचा तपास करत असतांना खबऱ्याने दिलेल्या माहिती वरून देहेडकरवाडी येथून विनोदसिंग सत्तलाल राणा या दुचाकी चालकास ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची विचारपूस केली असता, त्यांने शहरातील विविध भागातून ९ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. यात ३ पल्सर, ५ सीडी डिल्क्स व एक शाईन या गाड्यांचा समावेश होता. या गाड्यांची एकूण किंमत ४ लाख रुपये आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोली अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, सउपोनि. पठाण. पो कॉ. राम शिंदे, अनिल काळे, चंद्रकात माळी, कृष्णा भडंगे, भरत कडूळे, गौतम वाघ, अजय फोके यांनी केली.या दुचाकी चोराकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
पोलिसांत संचारले नवचैतन्य...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 00:55 IST