शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

जालना जिल्ह्यात तूर खरेदी ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 01:00 IST

नाफेडने तुरीची आॅनलाईन नोंदणी बुधवार पासून बंद केली. मात्र आधीच आॅनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदीस नाफेडकडून नकार दिल्याने जिल्हयातील तूर खरेदीला ब्रेक लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नाफेडने तुरीची आॅनलाईन नोंदणी बुधवार पासून बंद केली. मात्र आधीच आॅनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदीस नाफेडकडून नकार दिल्याने जिल्हयातील तूर खरेदीला ब्रेक लागला आहे. तब्बल ६ हजार नोंदणीकृत शेतकºयांची तूर खरेदी बाकी असतांना खरेद बंद केल्याने नोंदणीकृत शेतक-यांतून संताप व्यक्त होत आहे.जिल्ह्यातील जालना, अंबड, भोकरदन, परतूर, जाफराबाद, तीर्थपुरी, आष्टी, मंठा इ. आठ हमीभाव केंद्रावर साडेआठ हजार शेतक-यांनी तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली. त्यापैकी फक्त १८०० शेतक-यांची हमीभावाने तूर खरेदी केली आहे. मात्र तब्बल ६ हजार २०० शेतक-यांची अद्यापही तूर खरेदी करण्यात आली नाही. आधीच नाफेडने उशिराने जिल्ह्यात तूर खरेदी करण्यास सुरूवात केली. मात्र तूर ठेवण्यासाठी जागेच्या अडचणीमुळे जिल्ह्यात दोन वेळेस तूर खरेदी ठप्प झाली होती. १६ एप्रिल रोजी नाफेडने पत्र काढून जिल्ह्यातील १८ एप्रिल पासून आॅनलाईन नोंदणीसह तूर खरेदी बंद करण्याचे आदेश दिले. एकीकडे मोठ्या प्रमाणात शेतक-यांनी नोंदणी केली. मात्र जाणीवपूर्वक तूर खरेदी संथ गतीने केल्यानेच अद्यापही शेतक-यांची तूर खरेदी झाली नसल्याचा आक्षेप शेतक-यांनी केला आहे.

टॅग्स :pigeonsकबुतरFarmerशेतकरी