शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशक दक्षता; जनजागृतीसाठी विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 00:58 IST

कपाशीसह इतर पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कीटकनाशकांची फवारणी करताना ४४ शेतकरी बाधित झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेत कृषी विभागाने अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कीटक नाशक कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. कपाशीसह इतर पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.आस्मानी-सुलतानी संकटात सापडलेला जालना जिल्ह्यातील शेतकरी पिकांवर पडलेल्या रोगराईला घालविण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करीत आहे. मात्र, ही फवारणी करताना आवश्यक ती दक्षता न घेतल्याने अनेक शेतकऱ्यांना कीटकनाशकांची बाधा होत आहे. चालू महिन्यातील २० दिवसात तब्बल ४४ शेतकºयांना कीटकनाशकांची बाधा झाली होती. यातील ३८ जणांवर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले. तर प्रकृती चिंताजनक असलेल्या ६ जणांना पुढील उपचारासाठी औरंगाबादला रेफर करण्यात आले होते.याबाबत ‘लोकमत’ने ‘४४ शेतक-यांना कीटकनाशकाची बाधा’ या मथळ्याखाली सोमवारी वृत्त प्रसिध्द केले होते.या वृत्ताची दखल घेत कृषी विभागाने मंगळवारी अधिकारी, कर्मचाºयांसह कीटकनाशक कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीत पुढील १५ दिवस विशेष मोहीम हाती घेऊन कीटकनाशक फवारणी करताना शेतक-यांनी कोणती दक्षता घ्यावी, याबाबत गावा-गावात जाऊन जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी बी. एस. रणदिवे, गुणनियंत्रक एस. डी. गरांडे, जिल्हा मोहीम अधिकारी कराडे यांच्यासह कंपन्यांचे प्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.संयुक्त पथक देणार माहितीकृषीने नियुक्त केलेल्या पथकात कृषीचे अधिकारी, कर्मचारी आणि कंपनीचे प्रतिनिधी राहणार आहेत. तर समन्वयक म्हणून कृषी अधिकारी हे काम पाहणार आहेत, अशीही माहिती यावेळी आयोजित बैठकीत देण्यात आली.शेतक-यांनी दक्षता घ्यावीकीटकनाशकांची फवारणी करताना शेतक-यांनी संपूर्ण शरीर झाकावे, फवारणी यंत्र गळके असल्यास त्याचा वापर करू नये, उरलेले द्रावण जमिनीत खड्डा करून गाडावे.व्यक्ती, पशुधन यापासून दूर ठेवावे, प्रथमोपचार पेटी जवळ ठेवावी यासह इतर आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन कृषी अधीक्षक जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, कृषी विकास अधिकारी बी.एस.रणदिवे यांनी केले आहे.

टॅग्स :Lokmat Impactलोकमत इम्पॅक्टAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी