शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पंचनामे, पीकविम्यातील भेदभाव खपवून घेणार नाही- खोतकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 00:34 IST

शेतक-यांची नावे वगळण्याचा भेदभाव यंत्रणेकडून होत असल्याच्या तक्रारी असून, त्यामुळे हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप पिकांसह फळबागा नष्ट झाल्या आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाने आर्थिक तरतूद केली आहे. मात्र, पंचनामे करताना तसेच पीक विम्यातून लागवड केलेल्या फळबाग उत्पादक शेतक-यांची नावे वगळण्याचा भेदभाव यंत्रणेकडून होत असल्याच्या तक्रारी असून, त्यामुळे हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिला.खोतकर यांनी सोमवारी प्रशासकीय अधिका-यांसमवेत शेतात जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली. शेतक-यांनी खचून जाऊ नये. आपण स्वत:, शिवसेना पक्ष व शासन तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहे, असे सांगत खोतकरांनी शेतक-यांना धीर दिला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, पंचायत समिती सभापती पांडुरंग डोंगरे, पं.स. सदस्य जनार्दन चौधरी, पंडित भुतेकर, संतोष मोहिते, बाबा मोरे, तुळशीदास काळे, मुरलीधर शेजुळ, तुकाराम शेजुळ, मुरलीधर थेटे, शैलेश घुमारे, काशिनाथ जाधव, प्रभाकर सुळसुळे, गणेश शिंदे, आप्पासाहेब उगले, सचिन मोरे आदींची उपस्थिती होती.खोतकर यांनी गोलापांगरी येथील मनोज मोरे यांच्या शेतातील पिकांची पाहणी केली. तसेच कल्याण प्रकल्प सिडस येथे उध्वस्त झालेले कापूस, सोयाबीन व मका आदी पिकांची पाहणी केली. जळगाव सोमनाथ, वखारी व धारकल्याण येथे भेटी देऊन बागांची पाहणी केली. दरम्यान, बाजीउम्रद येथील शेतकरी शिवाजी डोंगरे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत  संबंधितांना सूचना दिल्या. यावेळी शेतक-यांनीही आपल्या व्यथा खोतकरांसमोर मांडल्या.खरीप हंगामातील दमडीही शेतक-यांच्या हाती मिळाली नाही. खचलेल्या शेतक-यांनी पुन्हा नव्या उमेदीने काही ठिकाणी रबी हंगामातील हरभरा, ज्वारी व गव्हाची पेरणी केली. मात्र दिवाळीनंतर पडलेल्या अवकाळी पावसाने ही पेरणीही वाया गेली आहे. त्यामुळे पंचनामे करताना खरिपाबरोबर रबी हंगामातील पेरणी, पिकांचे स्वतंत्र पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना खोतकरांनी दिल्या.

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीRainपाऊस