जालना : किरकोळ कारणावरून एकाला चौघांनी मारहाण केल्याची घटना अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव येथे घडली. याप्रकरणी राजेंद्र कांबळे यांच्या फिर्यादीवरून महादेव मुरलीधर घोंगडे, विठ्ठल तुळशीराम घोंगडे, बंडू नामदेव घोंगडे, अशोक देवीदास घोंगडे यांच्याविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास चौधरी करीत होते.
------------------------
जांब समर्थ येथून दोन गायी चोरीला
जालना : शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेल्या दोन गायी चोरून नेल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथे गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी उद्धव शिवाजी चव्हाण यांच्या फिर्यादीवरून घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोउपनि कापुरे करीत आहेत.
------------
बसची दुचाकीला धडक; दोघे जखमी
जालना : भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने (एमएच २०. बीएल.३८८८५) दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याची घटना जालना तालुक्यातील वाघ्रूळ येथे गुरुवारी दुपारी घडली. या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सरला भावले यांच्या फिर्यादीवरून बस चालकाविरुद्ध जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहेकॉ लांडगे हे तपास करीत आहेत.
-----------------