जालना : भोकरदन तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातून बेकायदेशिररीत्या वाळू उपसा करणाऱ्यास भोकरदन पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले. त्याच्याकडून ट्रॅक्टरसह एक ब्रास वाळू जप्त करण्यात आली. याप्रकरणी गणेश पिंपळकर यांच्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर शालीकराव फुके (२८ रा. फत्तेपूर ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोउपनि नागरगोजे करीत आहेत.
महिलेस फसवले
जालना : मी एसबीआय बँकेचा मॅनेजर बोलतोय, तुम्हाला ऑनलाइन यॉनो अॅप्सची सुविधा देतो, असे म्हणून फिर्यादीकडून आधार कार्ड, पॅन कार्ड व एटीएम नंबर घेऊन खात्यावरील ३६ हजार रुपये ऑनलाइन काढल्याची घटना जालना शहरातील कसबा येथे घडली. याप्रकरणी मथुरा मुळे यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक महाजन करीत आहेत.
बेकायदेशीर कीटकनाशकाची विक्री करणाऱ्यावर कारवाई
जालना : शासनाची बंदी असलेले कीटकनाशक विकणाऱ्या विरुद्ध जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई रविवारी दुपारी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाच्या पथकाने केली. सुरज अमृत पायघन (रा. माहोरा) यांच्यासह कंपनीच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोउपनि काकरवाल करीत आहेत.