शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अपर पोलीस महासंचालकांनी घेतला विविध विभागांच्या कामाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 00:45 IST

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वत: नियमांचे पालन करावे, शिस्त पाळावी, अशा सूचना राज्य पोलीस दलातील कायदा व सुव्यवस्थेचे अप्पर पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पोलीस दल हे शिस्तीचे आहे. कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वत: नियमांचे पालन करावे, शिस्त पाळावी, अशा सूचना राज्य पोलीस दलातील कायदा व सुव्यवस्थेचे अप्पर पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिल्या.पोलीस मुख्यालयात मंगळवारी आयोजित कर्मचाऱ्यांच्या बैठकीत सेठ बोलत होते. तत्पूर्वी सकाळी ७ वाजता पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांच्या नेतृत्वाखाली परेड झाली. परेडनंतर विविध विभागांतील पथकांनी आपल्या कामाबद्दल प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. यात पीटी बॉल, विविध शस्त्रास्त्रांची हाताळणी, जमाव पांगविण्यासाठी केल्या जाणाºया उपाययोजना, पोलीस बँड, श्वान पथकाने आपल्या कामांचे प्रात्यक्षिक सादर केले. यानंतर आयोजित कर्मचा-यांच्या बैठकीत उपस्थितांचे प्रश्न जाणून घेण्यात आल्या. त्यानंतर हसनाबाद व भोकरदन पोलीस ठाण्यातील कामकाजाची पाहणी सेठ यांनी केली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्यासह सर्वच उपविभागीय अधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, सेठ हे बुधवारी पोलीस मुख्यालयातील विविध विभागांची पाहणी करणार आहेत. पोलीस मुख्यालयातील पाहणीदरम्यान सेठ कोणकोणत्या सूचना देतात, याकडे लक्ष लागले आहे.राजकीय परिस्थितीची माहितीसेठ यांनी भोकरदन पोलीस ठाण्याच्या कामकाजाचीही पाहणी केली. यावेळी राजकीय परिस्थितीचा आढावा घेताना यापूर्वी दानवे, खोतकरांमधील वाद आणि दाखल असलेल्या जुन्या गुन्ह्यांचीही माहिती घेतली.याबाबत जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिका-यांना सूचना देत प्रस्ताव मंजुरीसाठी मदत करण्याची ग्वाही दिली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाची पाहणी केली. यावेळी पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, उपविभागीय पोलीस अधिकारी जायभाय, पोनि. दशरथ चौधरी व अधिकारी उपस्थित होते.तक्रारींचा निपटाराबैठकीत काही कर्मचा-यांनी उच्च शिक्षणासाठी अनुदान, इन्क्रीमेंट, पदोन्नती, कार्य नोंदणी यासह इतर अडचणी रजनिश सेठ यांच्यासमोर मांडल्या होत्या. सेठ यांनी या तक्रारींबाबत संबंधित अधिकारी, कर्मचा-यांकडून माहिती घेत तक्रारींचा निपटारा केला.तीन तास तपासणीहसनाबाद : रजनीश सेठ यांनी हसनाबाद पोलीस ठाण्यातील विविध विभागांची तीन तास तपासणी केली. प्रारंभी मानवंदना देऊन सपोनि एम.एन.शेळके, फौजदार गुलाब पठाण यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर कर्मचारी निवासस्थानांची पाहणी करून त्याचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या.तसेच पोलीस ठाण्याच्या संरक्षक भिंतीचे काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच नागरिकांशी समस्यांसह इतर विषयांवर चर्चा केली. ठाण्याच्या परिसरातील वृक्षलागवड, स्वच्छतेबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाय उपस्थित होते.

टॅग्स :Jalna S Pपोलीस अधीक्षक, जालनाPoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे