जिल्ह्याचा विचार केला असता, या निवडणुकीत बड्या नेत्यांनी जरी प्रत्यक्षात सहभाग घेतला नसला तरी, अप्रत्यक्षपणे ते या निवडणुकीत सहभागी झाले होते. प्रचारादरम्यान काही ठिकाणी मेळावे, सभा घेण्यात आल्या. तसेच पॅलनला मोठे महत्त्व असल्याने आपल्या पॅनलमध्ये जास्तीत जास्त चांगले व्यक्ती यावेत म्हणून प्रयत्न झाले. त्याचे चांगले, वाईट परिणाम आज जाहीर झाले होते. मतमोजणीसाठी जालना शहरातील आयटीआयमध्ये सकाळपासून गर्दी झाली होती. यावेळी मोठा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. अनेक ग्रामपंचायतींचे निकाल हे अर्धा ते पाऊण तासात बाहेर येत होते. निकाल ऐकण्यासाठी प्रशासनाकडूनही चोख व्यवस्था केली होती.
चौकट
जनता जिल्हा शिवसेनेच्या पाठीशी
जिल्ह्यातील शिवसेनेने या महत्त्वाच्या निवडणुकीत नेहमीप्रमाणे आघाडी घेतली आहे. निवडणुकीची तयारी करताना आम्ही खूप आधीपासून ग्रामीण भागातील दौरे करून संघटन मजबूत केले होते. त्यामुळे यंदा विशेषकरून भाजपला शिवसेनेने एकप्रकारे मोठा हाबाडा दिला आहे. भोकरदन तालुक्यात मनीष श्रीवास्तव तसेच बदनापूर तालुक्यात माजी आ. संतोष सांबरे यांनी चांगली बाजू लढविल्याने अनेक मोठ्या ग्रामपंचायती आमच्या ताब्यात आल्या असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी दिली.
--------------------